वडेट्टीवारांची ‘त्या’ वक्तव्यावरून माफी:काल म्हणाले दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का, आज म्हणतात विपर्यास केला!

वडेट्टीवारांची ‘त्या’ वक्तव्यावरून माफी:काल म्हणाले दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का, आज म्हणतात विपर्यास केला!

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांवरच केला आहे. अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर देशात काहीतरी वेगळे वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम काही ठराविक माध्यमे करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आपल्या वक्तव्यावरून मी माफी मागत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी सर्व मीडियाला विनंती देखील केली. माझे भाषण पूर्ण दाखवा. अर्धवट दाखवू नका. सरकारचे अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अतिरेक्यांनी पहिल्यांदाच धर्म विचारला आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला यामध्ये त्यांना शिकवून पाठवले गेले आहे. देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचा हे काम पाकिस्तानचे होते, असे माझे मत असल्याचा देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?. काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचे म्हणणे आहे की असे काही घडलेच नाही, असे विजय वडेट्टीावर यांनी म्हटले. त्यांच्या या विधानवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. माजी आमदार राम सातपुते यांची टीका भाजप नेते व माजी आमदार राम सातपुते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या, त्यावेळेस अशा पद्धतीने संभ्रम करणारे वक्तव्य काँग्रेस नेते करतात, वडेट्टीवारांच्या तोंडून त्या ठिकाणी राहुल गांधी बोलले आहेत. पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले, अशा पद्धतीची मानसिकता ही हिंदू विरोधी मानसिकता आहे. त्या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. मारताना हिंदूंना धर्म विचारून, नाव विचारून पॅन्ट काढून अतिरेक्यांनी मारले आहे, याचे उत्तर मोदी सरकार येणाऱ्या काळात देईल. मात्र, दहशतवाद्यांना खतपाणी घालायचे काम अशा प्रवृत्ती करतात, मी याचा जाहीर निषेध नोंदवतो. अशा पद्धतीने बोलणे म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव गेला आहे, त्यांचा अपमान करणारे आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment