वैष्णवी हगवणेंचा मुलगा जनकचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे:सामाजिक तपासणी अहवालानुसार त्याच ‘Fit Person’

वैष्णवी हगवणेंचा मुलगा जनकचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे:सामाजिक तपासणी अहवालानुसार त्याच ‘Fit Person’

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात नीलेश चव्हाण कडे मिळालेला वैष्णवी हगवणे यांचा मुलगा जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. स्वाती कस्पटे या वैष्णवी हगवणे यांच्या आई आहेत. बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालात स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती म्हणजे ‘Fit Person’ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता हा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला आहे. या संदर्भात मंत्री आतिदी तटकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालात स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता वैष्णवी हगवणे यांचा मुलगा जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडेच असेल. त्याच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment