वैष्णवी हगवणेच्या लग्नाचा रुखवत आयपीएस सुपेकरांच्या पत्नीने केला:कसपटे कुटुंबांकडून घेतले होते 1 लाख 50 हजार रुपये, वैष्णवीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले

वैष्णवी हगवणेच्या लग्नाचा रुखवत आयपीएस सुपेकरांच्या पत्नीने केला:कसपटे कुटुंबांकडून घेतले होते 1 लाख 50 हजार रुपये, वैष्णवीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे अनेक कारनामे समोर येत आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात येत आहेत. कालच म्हणजे दिनांक 30 मे रोजी त्यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. आता सुपेकर यांच्या पत्नीने वैष्णवीच्या लग्नात रुखवत तयार केले होते, यासाठी त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबांकडून 1 लाख 50 हजार रुपये स्वीकारले असल्याचे समोर आले आहे. वैष्णवी हगवणेच्या लग्नात 1 लाख 50 हजारांचे रुखवत तयार करून दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिली आहे. तसेच शशांकच्या मामी म्हणजेच आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीने हा रुखवत बनवल्याचेही सांगितले आहे. रुखवत तुम्ही बनवू नका आमच्या पाहुण्या सुपेकर यांच्याकडून रुखवत बनवून घ्या असे वैष्णवीच्या सासूने व नणंद करिश्माने कसपटे यांना सांगितले होते, अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे. वैष्णवीच्या आईच्या खात्यावरून हा व्यवहार रुखवत सुपेकर यांच्याकडून बनवून घ्या असे सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्या सांगण्यावरून सुपेकरांच्या बायकोला रुखवतची ऑर्डर देण्यात आली. या रुखवतासाठी 1 लाख रुपये चेकद्वारे तर 50 हजार रुपयांची रोख रक्कम दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे. तसेच वैष्णवीच्या आईच्या खात्यावरून हा व्यवहार करण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता यावरून सुपेकर यांच्या पत्नीवर देखील कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली दरम्यान, आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांची पदावनती करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची आता उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली झाली आहे. याआधी ते विशेष पोलिस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची पदावनती उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याच गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदुकीचा परवाना शशांक हगवणे व सुशील हगवणे यांना मिळवून दिल्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर करण्यात आला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment