वैष्णोदेवी धाम…:रोज 30 क्विंटल चणे-शिऱ्याचा नैवेद्य, प्रथमच 4 हजार लोकांची मार्गात निवास सोय, हेलिकॉप्टरमध्ये ज्येष्ठ-दिव्यांगांना राखीव जागा

चार दिवसांपासून जम्मू भागातील कठुआ जिल्हा दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारामुळे भयभीत होता. पण तेथून १२८ किमीवरील माता वैष्णोदेवीच्या कटरात त्याचे त्याची कुणकुणही नाही. येथे लाखो भाविकांचा जयजयकार निर्विघ्नपणे सुरू आहे. मी आता वैष्णोदेवी मंदिराच्या १२ किमी यात्रामार्गाच्या प्रवेशस्थळी आहे. येथे गर्दी आहे आणि वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने प्रथमच एंट्री गेटच्या मागे २००० लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. त्याचे बुकिंग मंडळाच्या वेबसाइटवर होते. रविवारी सकाळी १० वाजता ८ हजार भक्त नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातेच्या दर्शनास रवाना झाले आहेत. शनिवारी ३८ हजार भाविकांनी दर्शन घेतले. ट्रस्टचे सीईओ अंशुल गर्ग यांनी सांगितले की, आज १० हजारांवर भाविक येतील. एरवी ही संख्या २२ ते ३० हजारांवर असते. गर्दी खूप आहे, त्यामुळे रोज ३० क्विंटल चणे व शिऱ्याचा प्रसाद तयार होत आहे, तो एरवीपेक्षा १० क्विंटल जास्त आहे. ५२०० फूट उंचीवरील गुहा मंदिरात नित्य कार्यक्रमानुसार दोन आरत्या होत आहेत. एक सकाळी सहाला तर दुसरी सायंकाळी ६ वाजता. यंदा तीन-चार नवीन सुविधा सुरू होत आहेत. उदा.- मंदिरात होणारी अटका आरती आणि अर्धकुमारीच्या गर्भगृह आरतीत दिव्यांग भाविकांसाठी स्लॉट राखीव आहेत. त्याचे बुकिंग ऑनलाइन करता येते. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी हेलिकॉप्टर आणि मोफत बॅटरी कार सेवेत २०% कोटा आहे. हेलिकॉप्टरचे भाडे ४,२०० रु. प्रति व्यक्ती आहे. पाण्याचे एटीएमही आहेत. अर्धकुमारीत २००० भाविकांची राहण्याची सुविधा आहे. आपत्कालीन स्थितीत भाविकांना रोखण्यासाठी सर्व सुविधा आहेत. रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीरसिंह म्हणाले की, संपूर्ण मार्गाची निगराणी ड्रोन आणि ६५० हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेऱ्याने होत आहे. प्रथमच दोन नियंत्रण कक्ष स्थापन केले असून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सिस्टिमच्या रेडिओ लहरींद्वारे यात्रा मार्गावर गर्दीच्या स्थितीचे आकलन करून आपत्कालीन अलर्ट देत आहेत. मंदिर भवनाजवळील १२० कॅमेरे फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. मार्गावर ६ लंगर, २४ तास सेवा, रोज ५० हजार लोकांचे जेवण
अर्धकुमारीत प. बंगालमधून आलेले भाविक योगेश चौधरी देवस्थान मंडळाच्या लंगरमधून प्रसाद घेऊन परतले होते. त्यांनी सांगितले की, अविस्मरणीय वातावरण आहे. लंगरमध्ये केव्हाही जा, जेवण गरमच मिळेल. सीईओ गर्ग यांच्यानुसार, यंदा गर्दी जास्त आहे. त्यामुळे तीन अतिरिक्त लंगर सुरू केले आहेत. एकूण ६ लंगर आहेत, तेथे ५० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था आहे. येथे २४ तास सेवा आहे. कोणीही उपाशी जाणार नाही.