वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंचा संताप:म्हणाल्या – आता मी पुण्यात आहे तर पुण्यातील प्रश्न विचारा, बीडचे का विचारतात?

वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंचा संताप:म्हणाल्या – आता मी पुण्यात आहे तर पुण्यातील प्रश्न विचारा, बीडचे का विचारतात?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीने 1500 पेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा आरोप पत्रात केला आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या पत्रकारावरच संतापल्याचे दिसून आले. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी आता पुण्यात आहे तर मला पुण्यातील प्रश्न विचारा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज पुण्यात पशुसंवर्धन आयुक्तालयात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांना सीआयडी कडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रामध्ये वाल्मीक कराड याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता त्या पत्रकारांवर चिडल्या. मला बीडचे प्रश्न का विचारतात?
आरोपपत्रात काय लिहिले तुम्ही वाचेल का? दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला तो प्रश्न विचारा, मी पुण्यात आलेली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात.? असा सवाल पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना केला. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. मुख्यमंत्री फडणवीसांवर माझा पूर्ण विश्वास
मी गृह खात्याशी संबंधित नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती देणे योग्य आहे. ते जी काही माहिती द्यायची ती कोर्टाला देतील. त्यानंतर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी याबाबत एकदा शब्द दिल्यानंतर त्यांच्या टीम मधील एक मंत्री म्हणून मी वारंवार याबाबत भाष्य करणे माझ्या भूमिकेला साजेसे नाही. संवेदनशीलपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे हे माझे एक हजार एकवेळा बोलून झालेला आहे.’, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. हे मी किती वेळ बोलू?
‘देशमुख यांच्या हत्याबाबत तीव्र निषेध आणि तसेच या प्रकरणाची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? घटना घडल्यापासून मी त्यावर बोलत आहे. 12 डिसेंबरचे माझे भाषण काढले तर त्यामध्ये 90 टक्के मी त्याबाबतच बोलले आहे. आता त्याच्या आतल्या बाबींवर बोलण्याचा औचित्य नाही आणि मला माहिती देखील नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. … तर तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का? – दमानिया
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर टीका सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य ऐकून धक्का बसला. त्या म्हणतात मी पुण्यात आलीये तर इथले प्रश्न विचारा? बीडवर नको. तुम्ही बीडच्या आहात. परळीमध्ये आहात. मग तुम्हालाच तेथील प्रश्न विचारणार ना? तुम्ही अमेरिकेत गेलात तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का? असा टोला दमानिया यांनी लगावला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment