वाल्मीक कराडची जिकडे तिकडे मालमत्ताच मालमत्ता:आता लातुरातही मोठे घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 4 ते पावणेपाच एकर जमीन

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर सोलापूर येथील बार्शी येथे जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती मिळाली होती. त्यातच आता ज्योती जाधव हिच्या नावावर लातूरातही चार ते पावणे पाच एकर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर नंतर आता लातूरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर-टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळील चार ते पावणे पाच एकर जमीन दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर आहे. या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात 3 फ्लॅट, फर्ग्युसन कॉलेज रोडवरही मोठी गुंतवणूक
वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीला दोन मुले असून त्यांच्या नावावर पुण्यात संपत्ती विकत घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33 मध्ये एक तर दुसरा तर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि खराडीसह आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावावर असल्याचे समजले. शिवाय पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत ऑफिससाठी जागा घेतली असून ती मालमत्ता ज्योती जाधवच्या नावावर केली. कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीचे काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली होती. दुसऱ्या पत्नीच्या नावे सर्वाधिक मालमत्ता
वाल्मीक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावावर एकूण 19 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ती असल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराडच्या नावावर सर्वाधिक संपत्ती आहे. पहिली पत्नी मंजिरीच्या नावावर सव्वाचार कोटी रुपये, तर दुसरी पत्नी ज्योतीच्या नावावर तब्बल 17 कोटी 50 लाख रुपयांच संपत्ती असल्याची माहिती आहे. हे ही वाचा… संतोष देशमुख हत्या प्रकरण:वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; गरज पडल्यास सीआयडी पुन्हा कोठडी मागू शकते बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडीला गरज भासल्यास पुन्हा कोठडी मागू शकते. पूर्ण बातमी वाचा…

  

Share