विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची मोठी संधी:मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटना आणि धारा तेल पॅकिंग केंद्राचा शुभारंभ

विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची मोठी संधी:मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटना आणि धारा तेल पॅकिंग केंद्राचा शुभारंभ

नागपूर येथे मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ आणि धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी मदर डेअरीच्या बुटीबोरी येथील मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या कामाचाही शुभारंभ झाला. गडकरी यांनी विदर्भातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी सांगितले की कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर दूध उत्पादन होते. मात्र, भंडारा आणि गोंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादन अत्यंत कमी आहे. मदर डेअरीशी संलग्न ३५ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच उच्च दुग्धोत्पादक गायी पाळण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. त्यांनी इतर राज्यांतून गायी आणण्याऐवजी स्थानिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दूध उत्पादन वाढवण्यावर भर दिला. कार्यक्रमाला एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.पी. देवानंद आणि मराठवाडा दूग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण उपस्थित होत्या. गडकरी यांनी एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि इन विट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन १२ ते १५ लिटर दूध देणाऱ्या गायी तयार करण्याचे सुचवले. त्याचबरोबर मदर डेअरीमार्फत नागपूरच्या प्रसिद्ध संत्रा बर्फीचे मार्केटिंग करण्याचेही सूचवले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment