विधिमंडळ कामकाज:नागपूर हिंसाचाराचे विधिमंडळात तीव्र पडसाद; पायऱ्यांवर अन् सभागृहात विरोधक आमने-सामने

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुघल बादशहा औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री या मुद्यावरून दंगल उसळली होती. त्याचे पडसाद आज विधिमंडळ परिसरात दिसून आले. सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी या प्रकरणी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे अवघा विधिमंडळ परिसर दणाणून गेला होता. या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहूया विधिमंडळ कामकाजाविषयी अपडेट्स…