विनोद कांबळीच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे:काही कमी पडू न देण्याचा दिला डॉक्टरांना सल्ला, उपचारासाठी 5 लाखांची केली मदत

विनोद कांबळीच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे:काही कमी पडू न देण्याचा दिला डॉक्टरांना सल्ला, उपचारासाठी 5 लाखांची केली मदत

माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली असून त्यांना भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळी यांच्यावर उपचार सुरू असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. बीसीसीआयच्या पेन्शनवरच त्यांचा खर्च चालतो. त्यामुळे उपचारासाठी एवढा पैसा कुठून उभा करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर पडला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीला धावून आले आहेत. शिंदे यांनी विनोद कांबळी यांच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत मदत केली आहे. मंगेश चिवटे यांनी डॉक्टरांकडे देखील विनोद कांबळी यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती देखील चिवटे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केल्याचे समजल्यावर विनोद कांबळी यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच एकदा रुग्णालयात भेटण्यासाठी यावे, अशी विनंती देखील कांबळी यांनी केली आहे. तसेच लवकरच एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळी यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, विनोद कांबळी यांना आता बरे वाटत असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. याबाबत विनोद कांबळी यांनीच माहिती दिली होती. मला आता बरे वाटत आहे, असे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने मंगळवारी सांगितले. कांबळीने हॉस्पिटलच्या बेडवर ‘वी आर द चैंपियन-नो टाइम फॉर लूज’ हे गाणे गायले. लोकांना दारू पिऊ नका, तुमच्या घरच्यांना आवडणार नाही, असा सल्ला देखील त्यांनी दिला. 21 डिसेंबर रोजी रात्री उशिरा कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात त्याच्या मेंदूत गुठळी झाल्याचे स्पष्ट झाले. तो नुकताच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या कार्यक्रमात दिसला. त्याचा सचिन तेंडुलकरसोबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. कांबळीला 2013 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा तेंडुलकरच्या मदतीने त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment