हिंसाचारग्रस्त भागांमधून हिंदूंचे पलायन; अफस्पा लावा- भाजप:हिंसाचारादरम्यान बीएसएफच्या 5 तुकड्या तैनात

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोक हिंसाचारग्रस्त भागातील आपले घर सोडत आहेत. बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर सांगितले की, कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे मुर्शिदाबादच्या धुलियानहून ४०० पेक्षा जास्त हिंदू नदीपार करून लालपूर हायस्कूल, देवनापूर- सोवापूर हायस्कूल, देवनापूर जीपी, बैसनबनगर, मालदामध्ये आश्रय घेणे भाग पडत आहे. दुसरीकडे, बीएसएफने राज्य पोलिसांच्या अभियानांत सहकार्यासाठी पाच कंपन्या तैनात केल्या आहेत. भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यंाना पत्र लिहिले की, बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांना अफस्पा कायद्यानुसार अशांत क्षेत्र जाहीर केले पाहिजे. महतो यांनी बंगालमध्ये हिंदूंच्या पलायनाच्या सध्याच्या स्थितीची तुलना १९९० मध्ये काश्मीर पंडितांच्या पलायनाशी केली. भाजप नेते प्रदीप भंडारी यांनी सीएम ममता बॅनर्जींवर राज्यात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला. मुर्शिदाबाद हिंसेला तोंड देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा- काँग्रेस मालदा दक्षिणचे काँग्रेस खासदार ईशा खान चौधरी यांनी रविवारी टीएमसी सरकारकडे मुर्शिदाबाद जिल्ह्यात शांतता स्थापन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली. त्यंानी सांगितले की, सर्व पक्ष आणि समाजातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. चौधरी म्हणाले, ते शमशेरगंजला जाऊ इच्छितात. मात्र, पोलिसांनी गर्दी होण्याच्या शक्यतेमुळे जाण्यास नकार दिला. रविवारी रस्ते सुनसान, सशस्त्र दलांकडून गस्त सुरू दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर रविवारी पोलिस व केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांनी धूलियान, शमशेरगंज आणि सुती क्षेत्रात गस्त सुरू केली. यामुळे सर्व रस्ते सुनसान होते, दुकाने बंद होती. लोक घरांत राहिले. मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात सहभागी १५० लोकांना अटक केली. हिंसाचारात ३ ठार झाले.राज्यात वक्फ कायदा लागू होणार नाही,असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले,