विठ्ठल मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला:स्कायवॉकवरून अशा पद्धतीने जाता येईल विठ्ठल दर्शनाला‎

विठ्ठल मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला:स्कायवॉकवरून अशा पद्धतीने जाता येईल विठ्ठल दर्शनाला‎

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामानिमित्त मागील काही महिन्यांपासून बंद असलेला पश्चिम दरवाजा काम पूर्ण झाल्याने सोमवारपासून भाविकांसाठी खुला करण्यात आला. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, पश्चिमद्वार येथील जतन संवर्धनाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. त्यामुळे पदस्पदर्शनरांगेत बदल करून पश्चिमद्वारऐवजी उत्तर द्वारातून भाविक दर्शन करून बाहेर जात होते. दरम्यान पश्चिम द्वाराचे काम पूर्ण झाल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीची दर्शनरांग पूर्ववत केली. श्रींची पदस्पदर्शनरांग स्कायवॉकवरून दर्शन मंडपात पायऱ्यांवरून अंबाबाई दरवाजा येथून सोळखांबी येथील गरूड खांबाजवळून विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन दक्षिण बाजूच्या द्वारातून बाहेर पडून रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल. आणि मंदिराच्या पश्चिम दरवाजाने बाहेर पडतील, अशी माहिती मंदिर समिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्कायवॉकवरून अशा पद्धतीने जाता येईल विठ्ठल दर्शनाला

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment