वाडिया महाविद्यालय लैंगिक शोषण प्रकरण:पोलिसांची संशयास्पद भूमिका, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित पक्षाचा आरोप

वाडिया महाविद्यालय लैंगिक शोषण प्रकरण:पोलिसांची संशयास्पद भूमिका, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित पक्षाचा आरोप

पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल हाेऊन दाेन आराेपींना अटक करण्यात आली. परंतु तपासात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आराेप पीडित मुलीच्या वकिलांनी केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे पूर्वीचे ओएसडी असलेले वाडिया महाविद्यालयाचे संस्थाचालक सचिन सानप यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून या प्रकरणात महाविद्यालयाचे नाव समोर आले नाही पाहिजे अशी तंबी दिली. संस्थाचालक यांना या प्रकरणात आरोपी करणे गरजेचे आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या जबाबतून विविध स्वरूपाची माहिती समोर आली असून पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाच्या व्यतिरिक्त आणि गोष्टी समोर येत असून त्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप पीडित मुलीचे कुटुंबीयाचे वकील अश्विन भागवत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. वकील अश्विन भागवत म्हणाले, सहा सप्टेंबर पूर्वी तीनवेळा पीडित मुलीसाेबत घटना घडल्या हाेत्या. अल्पवयीन मुले व सज्ञान आराेपी यांनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते सर्वत्र साेशल मिडियावर व्हायरल केले हाेते. प्रशासनाकडे याबाबत सर्व माहिती हाेती. तिचे वडील त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याबाबतची माहिती त्यांना जाणीवपूर्वक दिली गेली नाही. १२ सप्टेंबर राेजी पुन्हा मुलीवर अत्याचार हाेऊन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर 21 सप्टेंबर राेजी महाविद्यालयास जाग येऊन त्यांनी कारवाई करण्यास घेतली. परंतु पीडित मुलीचीच चूक आहे असे भासवून तिला काॅलेज बाहेर काढण्याचा व हे प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. २३ सप्टेंबर राेजी मुलीचे वडील आक्रमक झाल्यावर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. परंतु त्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही अद्याप पिडित मुलीच्या आई -वडिलांचे जबाब पाेलिसांकडून नाेंदविण्यात आले नाहीत. पाेलिस ठाण्यात सहकार्य मिळत नाही. आम्हाला संशय आहे की, या प्रकरणात कुणीतरी दबाव टाकत असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पत्रकार परीषद घेणार म्हटल्यावर पाेलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेण्यास बाेलावले आणि जबाब घेतला. तसेच १६४ प्रमाणे मुलीचा जबाब नाेंदविण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार गुरुवारी तिचा जबाब घेण्यात आला. पण ज्या गतीने या प्रकरणाचा तपास हाेणे अपेक्षित हाेते तसे होत नाही. काेणत्यातरी दबावामुळे तपासात दिरंगाई हाेत आहे. या गुन्ह्याचा पारदर्शक तपास करण्याची गरज आहे. हे प्रकरण पॉक्सो असूनही ते विशाखा समिती समोर घेण्यात आले नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता, असेही अश्विन भागवत यावेळी बोलताना म्हणाले. —

​पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल हाेऊन दाेन आराेपींना अटक करण्यात आली. परंतु तपासात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आराेप पीडित मुलीच्या वकिलांनी केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे पूर्वीचे ओएसडी असलेले वाडिया महाविद्यालयाचे संस्थाचालक सचिन सानप यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून या प्रकरणात महाविद्यालयाचे नाव समोर आले नाही पाहिजे अशी तंबी दिली. संस्थाचालक यांना या प्रकरणात आरोपी करणे गरजेचे आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या जबाबतून विविध स्वरूपाची माहिती समोर आली असून पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाच्या व्यतिरिक्त आणि गोष्टी समोर येत असून त्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप पीडित मुलीचे कुटुंबीयाचे वकील अश्विन भागवत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. वकील अश्विन भागवत म्हणाले, सहा सप्टेंबर पूर्वी तीनवेळा पीडित मुलीसाेबत घटना घडल्या हाेत्या. अल्पवयीन मुले व सज्ञान आराेपी यांनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ते सर्वत्र साेशल मिडियावर व्हायरल केले हाेते. प्रशासनाकडे याबाबत सर्व माहिती हाेती. तिचे वडील त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याबाबतची माहिती त्यांना जाणीवपूर्वक दिली गेली नाही. १२ सप्टेंबर राेजी पुन्हा मुलीवर अत्याचार हाेऊन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर 21 सप्टेंबर राेजी महाविद्यालयास जाग येऊन त्यांनी कारवाई करण्यास घेतली. परंतु पीडित मुलीचीच चूक आहे असे भासवून तिला काॅलेज बाहेर काढण्याचा व हे प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. २३ सप्टेंबर राेजी मुलीचे वडील आक्रमक झाल्यावर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. परंतु त्यानंतर १० ते १२ दिवस उलटूनही अद्याप पिडित मुलीच्या आई -वडिलांचे जबाब पाेलिसांकडून नाेंदविण्यात आले नाहीत. पाेलिस ठाण्यात सहकार्य मिळत नाही. आम्हाला संशय आहे की, या प्रकरणात कुणीतरी दबाव टाकत असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पत्रकार परीषद घेणार म्हटल्यावर पाेलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेण्यास बाेलावले आणि जबाब घेतला. तसेच १६४ प्रमाणे मुलीचा जबाब नाेंदविण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार गुरुवारी तिचा जबाब घेण्यात आला. पण ज्या गतीने या प्रकरणाचा तपास हाेणे अपेक्षित हाेते तसे होत नाही. काेणत्यातरी दबावामुळे तपासात दिरंगाई हाेत आहे. या गुन्ह्याचा पारदर्शक तपास करण्याची गरज आहे. हे प्रकरण पॉक्सो असूनही ते विशाखा समिती समोर घेण्यात आले नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता, असेही अश्विन भागवत यावेळी बोलताना म्हणाले. —  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment