अपनी हार को जीतमें बदल देंगे हम:एकनाथ शिंदेंचा शहाजी बापू पाटलांना शब्द, म्हणाले – मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांना मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांचे पुनवर्सन करण्याचे संकेत दिले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर, शंभूराज देसाई, आमदार समाधान आवताडे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. आता एकनाथ शिंदे हे शहाजी बापूंना कोणती संधी देतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचे नसते. एखादी मॅच हरली म्हणून विराट कोहिलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट वेगाने गोलंदाजांवर तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते, त्यामुळे शहाजीबापू चिंता करू नका. शहाजी बापूंसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. शहाजी बापूंना मी वाऱ्यावर सोडणार नाही. ‘हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम’, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांना आणि त्यांच्या समर्थकांना शब्द दिला. एकनाथ शिंदे ज्यांच्या मागे, त्यांना चिंता करण्याची गरज नाही कार्यकर्ता हा काम करणारा असतो. त्याला हार जीतची पर्वा नसते. बापू तुमच्यावरचे लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटतंय. आभार यात्रेच्या निमित्ताने सध्या राज्यात फिरतोय, त्यामुळे शहाजीबापूंना मतदान करणाऱ्यांचे मी आभार मानतो. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांना यश आले नसले, तरी तेच जनतेच्या मनातील नेते आहेत, हे मला माहिती आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. काम करूनही यश मिळाल्याने निराश व्हायचे नाही सांगोल्यात गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील हे दोघेचे असतात. तिसरा कोणी नसतो, त्यामुळे अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचे नाही. लोकांनी मला काय दिले, यापेक्षा मी लोकांना काय दिले, हे लक्षात ठेवून काम करायचे असते, असेही ते म्हणाले. सांगोल्यात साडे पाच हजार कोटींचा निधी मला आपले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी काही कामे सांगितली. मी म्हटले काही काळजी करू नका. हा एकनाथ शिंदे असा आहे की, कुठल्या पक्षाचा आमदार आला, हे मी पाहिले नाही, त्याचे काम कसे होईल, एवढच मी पाहिले आहे. पण बापू तुमच्या मतदारसंघात साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी आला आहे. एवढा निधी कधीच आला नाही, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केला. विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंचा पराभव दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती. 50 आमदारांसोबत शहाजी बापू पाटील गुवाहाटी येथे गेले होते. त्यावेळी त्यांचा ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओके’ हा डायलॉग फेमस झाला होता. गत विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांना सांगोला मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता. कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी शहाजी बापूंना 25 हजार 386 मतांनी पराभूत केले होते.