कोणाला पण करा पण पवारांना चॅलेंज करू नका:रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा, महायुतीवरही केला हल्लाबोल

कोणाला पण करा पण पवारांना चॅलेंज करू नका:रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा, महायुतीवरही केला हल्लाबोल

कर्जत जामखेड येथे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राम शिंदे, चॅलेंज करायचे असेल तर कोणाला पण करा पण पवारांना करू नका, असे रोहित पवार म्हणाले आहेत. कर्जत जामखेडमध्ये आयपीएलच्या मॅचेस होणार का? असा सवाल राम शिंदे यांनी विचारला होता, त्यावर रोहित पवार म्हणाले, आम्हाला चॅलेंज करू नका, तुम्हाला आयपीएलचे साधे तिकीट तरी मिळते का? ते पाहा, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. पाच वर्षात मी या मतदारसंघात जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले आहेत. सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, कर्जत- जामखेडच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची दखल राज्याला घ्यावी लागली. कर्जत- जामखेडचे वजन हे राज्यात वाढले आहे. भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस पहाटे शपथविधी करतात तसेच राम शिंदे यांच्याकडे प्रवेशही रात्री होतात. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो. या पुढे आम्ही गद्दारांना सोडणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर त्यांचे हात छाटण्याचे काम आम्ही करू, असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे. पुढे रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना सांगितले होते की, काहीही करा रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेवा, पण त्यांना ते करता आले नाही. पवार साहेबांनी 10 वर्षात काय केले असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी विचारले होते, लोक 23 तारखेला दाखवून देतील पवार साहेबांनी काय केले ते. तसेच महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विचास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, माझ्याकडे चुकून गृहमंत्रीपद आले तर महायुतीमधील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील. महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीमधील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार, असेही रोहित पवारांनी यावेळी सांगितले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment