लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुर्ल्यातील सभेत आश्वासन

लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुर्ल्यातील सभेत आश्वासन

कुर्ल्यात मंगेश कुडाळकरांचा विजय पक्का असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. आमचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहोत. आम्हाला राज्यातील महिलांना लखपती झालेले बघायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यात प्रचाराचा नारळा फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या सभेची सुरुवात आयटम साँगने दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुर्ल्यातील सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आली. यामुळे सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. कुर्ल्यातील सभेनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शेर-ए-पंजाब मैदान येथे ही सभा पार पडणार आहे. ही बातमी अपडेट करत आहोत…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment