गोदावरी एक्सप्रेसमध्ये यंदा बाप्पा नाहीत:28 वर्षांची परंपरा खंडीत, चाकरमान्यांचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप

गोदावरी एक्सप्रेसमध्ये यंदा बाप्पा नाहीत:28 वर्षांची परंपरा खंडीत, चाकरमान्यांचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप

देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी उत्साही असतात. मात्र यंदाची मनमाड-नाशिककरांच्या 28 वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे. यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही. पासधारकांच्या बोगीत विराजमान होणारा गणपती बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनमाड येथील चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत संताप व्यक्त केला. गणपतीच्या अनेकांना सुट्ट्या नसतात, त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वेत एका बोगीत गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबणार आहे. गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत स्थापना केली जायची. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमाने दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. याचसोबत प्रवासात भजन, कीर्तन होते होते. मात्र यंदापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवला जाणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. गोदावरी एक्सप्रेस ही गाडी नाशिक जिल्ह्यापूर्ती मर्दयदेत होती. नंतर तिला पुढे धुळेपर्यंत वाढवण्यात आले. याला देखील चाकरमान्यांनी विरोध केला होता. मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाने हा प्रवास सुरू ठेवला होता. त्यानंतर आता मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपती बसवत होते. मात्र यंदा हा गणपती बसवण्यात आला नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

​देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी उत्साही असतात. मात्र यंदाची मनमाड-नाशिककरांच्या 28 वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे. यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही. पासधारकांच्या बोगीत विराजमान होणारा गणपती बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनमाड येथील चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत संताप व्यक्त केला. गणपतीच्या अनेकांना सुट्ट्या नसतात, त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वेत एका बोगीत गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबणार आहे. गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत स्थापना केली जायची. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमाने दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. याचसोबत प्रवासात भजन, कीर्तन होते होते. मात्र यंदापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवला जाणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. गोदावरी एक्सप्रेस ही गाडी नाशिक जिल्ह्यापूर्ती मर्दयदेत होती. नंतर तिला पुढे धुळेपर्यंत वाढवण्यात आले. याला देखील चाकरमान्यांनी विरोध केला होता. मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाने हा प्रवास सुरू ठेवला होता. त्यानंतर आता मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपती बसवत होते. मात्र यंदा हा गणपती बसवण्यात आला नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment