यंदा जून ते सप्टेंबर सरासरीच्या 103% पाऊस:महाराष्ट्रातही समाधानकारक

यंदा देशभरात जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये मान्सून समाधानकारक राहणार असून सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज देशातील आघाडीची खासगी संस्था स्कायमेटने आपला पहिला अंदाज जाहिर केला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या ८६८.६ मिमी पाऊस पडेल, यात ५ टक्क्यांची वाढ अथवा घट होऊ शकते, असे स्कायमेटच्या अहवालात म्हटले आहे. ला निना या मोसमात कमकुवत असून मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नसल्याचे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी सांगितले. कमकुवत ला निना आणि एल निनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. पुणे| राज्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान कायम राहणार असून, त्यानंतर त्यात घट अपेक्षित आहे.सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण गोवा, विदर्भात उष्णतेची लाट आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार, ९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस त्यासोबतच उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान खात्याने वतर्वली आहे. विदर्भात १० ते १२ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता आहे. दरम्यान, खान्देशात उष्णतेची तीव्र लाट आली असून मंगळवारी भुसावळात यंदाचे सर्वाधिक आणि राज्यातील सर्वाधिक ४५.८ अंश कमाल तापमान नोंदवले गेले. गेल्या वर्षी १८ एप्रिल रोजी भुसावळला ४५.२ अंश तापमान होते. हा विक्रम यंदा दहा दिवस आधीच मोडला गेला. शहरातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात तापमानाची ही नोंद करण्यात आली. तसेच नंदुरबार ४३.५, धुळे ४२ अंशाची नोंद झाली आहे. गुजरात तसेच राजस्थानात अती तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, बाडमेर येथे ४५.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे.दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व भारत आणि किनारपट्टीवर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.येत्या २४ तासात याची तीव्रता कमी होणार आहे. गुजरात आणि राजस्थानच्या अनेक भागात पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र या भागात देखील उष्णतेची लाट कायम. आहे.गुरुवार नंतर या भागातील उष्णतेची लाट कमी होईल.