2029 ला पंतप्रधान कोण? हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत:संजय राऊत यांचा पलटवार; मुख्यमंत्र्यांचा नकली स्वयंसेवक म्हणून उल्लेख

देशात 2029 ला कोण पंतप्रधान होईल? हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. 2019 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे. 2019 ला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. त्यानंतर गडबड घोटाळे करून त्यांनी विधानसभा जिंकली, हे जगाला माहिती आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशाच्या आणि भाजपच्या राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय महत्त्व आहे? हे मला देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागत असेल तर ते नकली स्वयंसेवक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे. तो नियम त्यांना लागू होत नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये, हा त्यांचाच नियम आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना लागू केला गेला. या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या नियमाला मान्यता दिली होती. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठीच नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते. आगामी 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवर चर्चा करण्यासाठीच ते संघाच्या मुख्यालयात गेले, असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या देशाला बाप नाही देशाला बाप नाही. तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्ण देखील आले आणि त्यांचे अवतार कार्य संपल्यावर गेले. तसेच आता नरेंद्र मोदी यांचे देखील अवतार कार्य संपलेले आहे. त्यांना देखील निघून जावे लागेल. लालकृष्ण अडवाणी देखील जिवंत असताना त्यांना शहाजहान प्रमाणे कोंडून ठेवण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणी यांनीच दोन खासदारांपासून स्वतःच्या पक्षाला सत्तेच्या शिखरापर्यंत भाजपला नेले आहे. पंतप्रधान पदाचा किंवा राष्ट्रपतिपदावर त्यांचा हक्क असताना त्यांना शहाजहान प्रमाणे बंदिस्त करण्यात आले होते. मात्र तेव्हा आम्ही ही मोगली संस्कृती आहे का? असा प्रश्न विचारला नाही. हे राजकारण आहे, तुम्ही देखील राजकारण केले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस नकली स्वयंसेवक भारतीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था आहे. त्यांची आई- वडील आहेत. त्यामुळे निर्णय हा मातृ संस्थाच घेणार आहे. 1978 साली मातृ संस्थेमुळेच सरकार पडले होते. भाजपमध्ये आणि भारतीय राजकारणामध्ये आरएसएसचे काय महत्त्व आहे? जर मी देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे असेल तर देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक आहेत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.