नोकरीचा पहिलाच दिवस, घरी परतताना काळाचा घाला:कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरिन शाहचा मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी

नोकरीचा पहिलाच दिवस, घरी परतताना काळाचा घाला:कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरिन शाहचा मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी

कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 49 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मृतांमध्ये आफरिन शाह या 19 वर्षीय तरुणीचा देखील समावेश आहे. कुर्ला येथील झालेल्या या दुर्घटनेत आफरिन शाह हिचा सोमवारी नोकरीचा पहिला दिवस होता. कामावरून घरी परत येत असताना बेस्ट बसच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावरून परत येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला, यामुळे तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याच सोबत कनीज फातिमा यांचा कामवार जाताना मृत्यू झाला आहे. फातिमा या रुग्णालयात नाईट ड्यूटीसाठी निघाल्या असताना या बेस्ट बसच्या धडकेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, कनीज अंसारी (55), आफरिन शाह (19), अनस शेख (20), शिवसम कश्यप (18), विजय गायकवाड (70), फारुख चौधरी (54), कनीज फातिमा, असे मृत जलेल्यांची नावे आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तसेच बसच्या कंत्राटी चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात आशा घटना घडू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. कंत्राटी किंवा अर्ध शिक्षित व्यक्तीला बस चालवायला कोणी दिली. त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. सदोष वाहन तयार करणे हे हा गुन्हा आहे. आपण कोणत्याही कंपनीचा उल्लेख करणे योग्य नाही. दोषपूर्ण वाहन तयार केल असेल तर चुकीच आहे. संबंधित कंपनीला सहआरोपी करावे. कंपनीचा मालक कोणीही असला तरी कारवाई झाली पाहिजे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment