गांधी घराण्याचा आंबेडकर, आरक्षणाला विरोध:CM देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केल्याचा दावा

गांधी घराण्याचा आंबेडकर, आरक्षणाला विरोध:CM देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केल्याचा दावा

काँग्रेसने अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळ खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने माफी मागायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संसदेत बोलत असताना मोदींनी काँग्रेस पक्षाचा पर्दाफाश केला, असे ते म्हणालेत. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना आणि संविधानातील आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे. हे सर्व पुराव्यांसहित मोदींनी जगासमोर आणले. त्यामुळे काँग्रेस पार्टी आता अशाप्रकारे नाटक करायचे काम करत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. काँग्रेसने इंदुमीलची जमीन दिली नाही
याच काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक पाडले. एवढेच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी परिनिर्वाण झाले, त्या इंदुमीलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली. पण सुईच्या टोकाइतकी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 दिवसांमध्ये 2 हजार कोटी रुपयांची जमीन राज्य सरकारला दिली, असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे, असे ते म्हणालेत. भाजपने बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचे काम केले लंडनमध्ये बाबासाहेबांनी जिथे वास्तव्य केले, ते घर लिलावात निघाले होते. हे घर लिलावात जाऊ देऊ नका, अशी मागणी अनेक संघटनांनी काँग्रेसच्या सरकारकडे केली होती. परंतु, त्यांनी लक्ष दिले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतले, असे फडणवीस म्हणाले. महु, दिक्षाभूमी, अलिपूर रोड अशा प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचे काम भाजप सरकारने केलेले आहे. काँग्रेसने बाबसाहेबांना कुठलाही सन्मान दिला नाही
काँग्रेसला फक्त बाबासाहेबांचे नाव वापरायचे आणि त्यांचे नाव वापरून राजकारण करायचे आहे. मात्र, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कधीही कुठलाही सन्मान दिलेला नाही, बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देखील काँग्रेसने दिलेला नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बीड घटनेवरून विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे
बीड आणि परभणीच्या घटनांवरून महाराष्ट्रात राहायला भीती वाटते, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे. प्रत्येक घटनेचे इतके राजकीयकरण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, जाती-जातीमध्ये विद्वेष तयार करायचे आहेत. त्यांना तेवढेच काम आहे, अशी टीका फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही
वाल्मीक कराडला अटक करा आणि बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती. बीडचे पालकमंत्री पद कुणी घ्यायचे? याबाबत मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ठरवू. पण बीडमध्ये कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment