आपल्या भागातल्या मराठ्यांनी हिंदू राष्ट्रावर सव्वाशे वर्षे राज्य केले:हिंदीत बोलायची गरज काय, मराठी भाषेचा अभिमान बाळगा; विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंचे विधान

आपल्या भागातल्या मराठ्यांनी हिंदू राष्ट्रावर सव्वाशे वर्षे राज्य केले:हिंदीत बोलायची गरज काय, मराठी भाषेचा अभिमान बाळगा; विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंचे विधान

महाराष्ट्र शासनाचा विश्व मराठी संमेलन 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सांगता समारंभ आज पार पडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी कार्यक्रमातील भाषणात बोलताना मराठी भाषेवर व भाषेच्या संवर्धनावर भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिले पाहिजे. फ्रेंच लोक त्यांच्या भाषेविषयी इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. आपल्या देशात सुद्धा आहेत. आणि जर बाकीचे राज्य जर भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो. आपल्याकडची मुलं आपल्याकडच्या मुली हे हिंदीमध्ये बोलायला जातात इंग्रजीमध्ये बोलत असतात अनेक वेळा भेटल्यानंतर हिंदीमध्ये बोलतात, का बोलायचं हिंदीमध्ये. असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले, आता आपल्या येथे राज्य गीत लावण्यात आले होते. मला सांगा कोणत्या राज्याचं राज्य गीत आहे. जय जय आसाम माझा.. जय जय गुजरात माझा.. जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज आपण या भूप्रदेशावरती हिंद प्रांतावर कारण हा देश जो काही आहे हिंदुस्तान भारत 1947 रोजी झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणे झाली ती सगळी बाहेरून आली आहेत या हिंदू प्रांतावर जर कोणी राज्य केलं असेल सव्वाशे वर्ष तर ते या भागातल्या फक्त मराठ्यांनी केले आहे. इतर कोणीही राज्य केलेले नाही जे कोणी केले ते बाहेरून आले होते. जे राज्यकर्ते होते त्याच्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायचे तर मग काय करायचे. मगाशी उदय सामंत म्हणाले होते की जे जे आम्ही सांगू ते ते मराठी भाषेसाठी केले जाईल. तसेच आमचे असे पण इच्छा आहे की आम्ही जे जे करू त्याला देखील तुमचा पाठिंबा मिळायला हवा. तेव्हा फक्त केसेस टाकू नका, माझा मागचा अनुभव सांगितला बाकी काही नाही. कारण जे जे मराठी भाषेसाठी करतोय आम्ही आमच्या परीने करतोय. तुमचे बहुतेक मशागत करण्यासाठी ही सगळी मंडळी बसली आहे. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. आमच्या सदानंद मोरे यांची व्याख्याने तुम्ही युट्युब वर ऐका. ती ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण मराठी आहोत म्हणजे नेमके काय आहोत. मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगत आलो आहे की, पुन्हा एकदा सांगतो. माणसाचे जे अस्तित्व असते किंवा एखाद्या भाषेचं जे काही अस्तित्व असतं ते जमिनीवरती असतं. आपण नेहमी म्हणतो आमचा इतिहास आमचा इतिहास जगाचा इतिहास पण इतिहास म्हणजे काय, इतिहास म्हणजे भूगोल. हिटलर असेल औरंगजेब असेल यांनी ठरवावं लागतं की मला हा भूप्रदेश हस्तगत करायचा आहे. तू भूप्रदेश हस्तगत केल्यानंतर तो बनतो इतिहास. सगळ्या इतिहास काढून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हे आपण इतिहास कशाला म्हणत आहोत आणि ती एकदा जमेल तुमच्या पायाखालन सरकली की तुमचं अस्तित्व गायब. त्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही. आपण मराठी संमेलन मराठी साहित्य संमेलन वगैरे भर होतो पण मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीच संमेलन हे शहरा शहरांमध्ये भरवला पाहिजे ही माझी शासनाकडे विनंती आहे. आपण ते अस्तित्व टिकवलं पाहिजे. नुकत्याच प्रगतीच्या नावावर ती आमच्याकडच्या जमिनी जाणार असतील मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत. विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो. एखाद्या कंपन्याने माझ्या इथली 5000 एकर जमीन विकत घेतली जमीन विकत घेतली म्हणजे काय की त्या 5000 एकर मधली सगळीगेली बाहेर कुठे गेली काय गेली माहित नाही. मला असं वाटतं इतिहासातून आपण जर काही बोध घेणार नसो तर इतिहास न वाचलेला बरा. 370 कलम हटवले म्हणजे नेमके काय याचा अर्थ काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो. खरंच तिथे अजून कोणी जमीन घेतली आहे की नाही ते माहीत नाही. खरे तर तिथे अंबानी आणि अदानी यांनी जागा घेतली पाहिजे. लोकांना विश्वास बसेल की आता जायला हरकत नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हे फक्त कश्मीर पुरतं नाहीये. तुम्ही जर आता हिमाचल प्रदेश मध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेश मध्ये जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय असून सुद्धा. आम्हीच का मोकळीक दिली आहे? तुम्ही या जमीन घेऊन जा, तुम्ही या जमिनी घेऊन जा. अहो तुमचा अस्तित्व टिकलं नाही भाषा कुठून टिकेल, राज ठाकरे यांनी म्हटले. तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल. माझी उदय सामंत यांना विनंती आहे की मराठी भाषेत सोबतच आपण मराठी माणसाचं अस्तित्व टिकवले पाहिजे. ते टिकणार असेल तर मराठी भाषेचा अस्तित्व टिकणार आहे. माझी प्रत्येक साहित्यिकांना विनंती आहे की त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे. पूर्वीच्या काळी साहित्यिक बोलायचे, राजकीय परिस्थितीवर देखील परखडपणे भाष्य करायचे. पण आता कोणी असे बोलताना दिसत नाही. तुम्ही चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे. आम्ही जसं तुमच्या पुस्तकांकडे आदर्श म्हणून पाहतो तुमच्याकडे आदराने पाहतो तसेच तुमच्या मतांकडे देखील आम्ही आदराने पाहायला पाहिजे. माझे मित्र अभिनेता रितेश देशमुख हे येता काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रचंड मोठा असा चित्रपट निर्माण करत आहेत. शिवरायांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः असणार आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत आणि आपल्या महापुरुषांना जातीपाती मध्ये आपण अडकवले नाही पाहिजे. प्रत्येक महापुरुष हा आपला आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे. या जातीपाती मधून महाराष्ट्र बाहेर येणं अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे, बाकीचे राज्य त्यांची भाषा म्हटलं की ते एकत्र येतात. कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडू मधले अभिनेते असो चित्रपटसृष्टीतले असो साहित्यिक असो सगळे राजकीय पक्ष एका प्रश्नासाठी म्हणून सगळे एकत्र एका व्यासपीठावरती येतात. आपण आपले मतभेद विसरून मराठीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. प्रत्येकाची काम करायची पद्धत असते आमची एक वेगळी पद्धत आहे. आपण जर एकत्रित आलो तर मराठी माणसाला हात लावायची जगामध्ये कोणाची किंमत होणार नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment