धनंजय मुंडे यांनी चुकीचे केले असे न्यायालयाला आढळले नाही:वकिलांचे स्पष्टीकरण; देखभालीसाठी अंतरिम आदेश असल्याचा दावा

धनंजय मुंडे यांनी चुकीचे केले असे न्यायालयाला आढळले नाही:वकिलांचे स्पष्टीकरण; देखभालीसाठी अंतरिम आदेश असल्याचा दावा

धनंजय मुंडे यांनी काहीही चुकीचे केले, असे न्यायालयाला आढळले नाही. न्यायालयाने दिलेले आदेश हे केवळ अंतिम देखभालीसाठी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांचे वकील ॲड. गणेश कोल्हे यांनी केला आहे. न्यायालयाने केवळ अंतरिम आदेश हा पोटगी संदर्भात दिला आहे. वास्तविक करुणा शर्मा यांच्यासोबत आपण लिव्ह-इन मध्ये राहत होतो, हे धनंजय मुंडे यांनी आधीच मान्य केले असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या निकालानुसार करुणा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा एक लाख 25 हजार तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकेच नाही तर खटला लढण्यासाठी करुणा यांना 25 हजार रुपये खर्च देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. ही पोटगीची रक्कम खटला सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही. मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे, असे आवाहन मुंडे यांच्या वकिल सायली सावंत यांनी केले आहे. आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः ते शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह-ईन मध्ये असल्याबाबतची यापूर्वीच कबुली दिली आहे. तोच या आदेशाचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ॲड. गणेश कोल्हे म्हणाले की, या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. कौटुंबिक प्रकरणात धनंजय मुंडे यांना धक्का:करुणा शर्मा यांना पहिली पत्नी म्हणून कोर्टाची मान्यता; दरमहा 1,25,000 रु. पोटगीचे आदेश धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा-मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. करुणा शर्मा-मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे या माध्यमातून कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्ण बातमी वाचा…. करुणा मुंडे यांचा आरोप:वाल्मीक कराडने कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडेंसमोर त्यांच्या कक्षात मारहाण केली, चौकशी करण्याची मागणी वाल्मिक कराडने मला कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी करुणा मुंडे यांनी केली. मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मान्यता देत पोटगी दिली आहे. करुणा धनंजय मुंडे नावासाठी मी मोठी किंमत चुकवली. यापुढे मला करुणा शर्मा नाही, तर करुणा धनंजय मुंडे म्हणावे असे आवाहनही त्यांनी केले. पूर्ण बातमी वाचा….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment