संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तळीरामांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तळीरामांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये तळीरामांनी आग लावली आहे. होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलालगत असलेला दहिसर परिसरात गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अचानक मोठे आगीचे लोट दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार ही आग तिथल्या तळीरामाकडून लावण्यात आली आहे. दरम्यान ही आग तळीरामांकडून लावण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. जवळपास दीड तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला लागले. सुरक्षारक्षक असताना लावली आग मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली. वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345 ब मधील असून संध्याकाळी 6.30 च्या सुमारास लागलेली आग ही 8 वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि रॅपिड टीमच्या प्रयत्नाने पूर्णपणे विझविण्यात आली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू या घटनेबद्दलचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. संबंधित लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. होळीनिमित्त शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. लोक होळी खेळण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. रंग काढण्यासाठी नदीत गेलेल्या 4 मुलांचा बुडून मृत्यू बदलापूर शहरातील चामटोली जवळच्या पोद्दार गृह संकुलात ही चारही मुले राहत होती. ही मुले दहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या मुलांचे दहावीचे पेपर सुरू आहेत. आता त्यांचे केवळ दोनच पेपर अद्याप बाकी आहेत. मात्र धुळवड असल्याने ही मुले रंग खेळली आणि रंग काढण्यासाठी आणि आंघोळी साठी म्हणून बदलापूर परिसरातील उल्हास नदीत गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले बुडण्याची माहिती समोर आली आहे. बदलापूर मध्ये एकीकडे होळीचा उत्साह सुरू असताना अचानक झालेल्या या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment