मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या:आई बहिणीचा मृतदेहाजवळ आक्रोश, विष घेत दोघींनीही संपवले आयुष्य; संपूर्ण कुटुंबच संपले

मुंबईहून गावी आलेल्या तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आपल्या मुलाला लटकलेल्या अवस्थेत बघून आई आणि बहिणीने आक्रोश केला. यानंतर दोघींनी सुद्धा विष प्रश्न करत आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते, त्यामुळे या तिघांच्याही आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबच संपले आहे. वयाची पंचविशी सुद्धा या तरुणाने पार केली नव्हती. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला हे दुःख अनावर झाले. जवळपास अर्धा तास मुलाच्या मृतदेहाला चिटकून मला सोडून जाऊ शकत नाहीस, तुझे लग्न करायचे होते, असे म्हणत आईने आक्रोश केला. मोहित कन्नौजिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वडील अंगद कन्नौजिया यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. मोहित हा मुंबईत काम करत होता. सात दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. बुधवारी आई कौशल्या देवी आणि बहीण सुप्रियासोबत औषद आणण्यासाठी तो हरपूरला जात होता. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने मोहित घरीच थांबतो म्हणाला व घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गोरखपूरमधील हरपूर बुधत परिसरातील कुचदेहरी येथील आहे. मोहित घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार, औषध घ्यायला जाताना मोहितचा आईशी वाद झाला. त्यानंतर मला जायचे नाही म्हणत मोहित घरीच थांबला. मग आई आणि बहीण पुढे निघून गेले. मोहितने घरी टॉवेलचा फास बांधत पंख्याला अडकवला. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आई आणि बहीण औषध घेऊन घरी परतले तेव्हा दार वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. बराच वेळ दार वाजवून शेवटी दोघींनी खिडकीतून डोकावून पहिले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मोहित त्यांना घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर दोघींनी घरच्या छतावरून घरात प्रवेश केला. मोहितला खाली उतरवून आई मोहितच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोरात रडू लागली त्यानंतर आई व बहिणीने विष घेत स्वतःचेही आयुष्य संपवले. आई व बहिणीने विष घेत संपवले आयुष्य आई व बहिणीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना वेदना होऊ लागल्या तेव्हा त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा शेजारच्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरा डॉक्टरांनी सुप्रियाला मृत घोषित केले, तर गुरुवारी सकाळी आई कौशल्या देवी यांचा मृत्यू झाला. मोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एसपी जितेंद्र कुमार श्रीवास्तव म्हणाले, कौटुंबिक वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आई आणि बहिणीनेही त्याला पाहून विष प्राशन केले. कालच उपचारादरम्यान त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. सकाळी आईचाही मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.