महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील:आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील:आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. नागपूर येथील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले, असे ते यावेळी म्हणाले. चित्रा वाघ यांचे गणरायाकडे साकडे दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणरायाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

​भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. नागपूर येथील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले, असे ते यावेळी म्हणाले. चित्रा वाघ यांचे गणरायाकडे साकडे दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणरायाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment