नवापूर शहरातील जनरेटर दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग:दुकानातील सर्व साहित्य जळून खाक, दीड तासानंतर 4 बंबाने आग नियंत्रित

नवापूर शहरातील लाईट बाजारात जनरेटर दुरुस्त करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. अचानक दुकानात आग लागल्याने आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले. संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे,नवापूर नगरपालिकेच्या अग्निशामन बंबने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.साधारण दीड तासापासून आग सुरू राहिल्याने आजूबाजूच्या दुकानात आग लागेल या भीतीने सामान खाली करण्यात आले दुकानात लेट मशिन, वेल्डिंग मशीन,जनरेटर दुरुस्त करण्याचे वर्कशॉप चे साहित्य जळून खाक झाले आहे दुकान मालक प्रविण पंचाल, विपूल पंचाल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनास्थळी नवापूर शहरातील नागरिक व्यापारी आग विझवण्याचा काम केले आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत त्यांचा पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सोबतच महसूल विभागाचे कर्मचारी, नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी, वीज वितरण कंपनीने कर्मचारी उपस्थित.होते. शहरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. आगीची घटना शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी असलेल्या गुजरात मेडिकल वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना खाली काढण्यात आले आजूबाजूच्या दुकानातील सामान बाहेर काढून त्यांना देखील मदत करण्यात आली. शेजारी असलेल्या त्रिमूर्ती जनरल स्टोअर्सचे वरच्या मजल्यात आग लागल्याने संपूर्ण नवापूर शहरातील हिंदू मुस्लीम बांधवांनी तात्काळ मदत करत त्रिमूर्ती जनरल स्टोअर्स मधील सामान बाहेर काढून मदत केली. आग विझवण्यासाठी स्वस्तिक पेट्रोल पंपचे मालक विपिनभाई चोखावाला यांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन नरकांडे दिले. आग विझवण्यासाठी नवापूर तलाठी कार्यालयातील कर्मचारी कमलेश भोई व रितेश मावची मोठे परिश्रम घेऊन आग नियंत्रित केल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच नगरपालिकेचे कर्मचारी सलीम पठाण, राजेश गावित, ललित वाघ, मिलिंद पाटील आदींनी घटनास्थळी मदत केली. घटनास्थळी नुकसान झालेल्या दुकान मालकांना महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पहा घटनेचे व्हिडीओ

  

Share