अडीच वर्षांपासून देत होता गुंगारा:पोलिसांना पाहताच गटारात लपला, चोरट्याला वॉशिंग सेंटरमध्ये नेत पोलिसांनी केली ‘धुलाई’

गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा चोरटा अखेर गटारात सापडला. पोलिसांनी गटारतून उचलून चोरट्याला थेट वॉशिंग सेंटरवर नेत चांगला धुतला. ही घटना घडली आहे लातूरच्या उदगीर तालुक्यात. हा चोरटा जनावरे चोरायचा. उदगरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याने पाच म्हशी चोरल्याची माहिती आहे. तसेच शेजारील कर्नाटक राज्यातून देखील त्याने अनेक जनावरे चोरली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस याचा शोध घेत होते, मात्र हा कुठेच सापडत नव्हता. लातूर जिल्ह्यातील उदगीर हे कर्नाटक राज्याच्या सीमेवरील शहर आहे. या भागात अशोक नामक जनावरे चोरणारा चोरटा चांगला सक्रीय होता. याचा तपास पोलिस अनेक दिवसांपासून देत होते. मात्र हा दरवेळी निसटून जाण्यात यशस्वी ठरायचा. अखेर पोलिसांना अशोक नामक चोरटा जिथे होता त्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उदगीर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पोलिस तपास करत असल्याचे लक्षात येताच चोरटा गटारीत उतरला. फक्त चेहरा बाहेर ठेवत संपूर्ण शरीर गटारीत सोडून तो बसला होता. पोलिसांना हे लक्षात आले. पोलिसांनी अलगद त्याला बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. पोलिस त्याला बाहेर काढत असताना चोरट्याने त्यांच्या अंगावर घाण फेकण्याचा प्रयत्न केला तसेच निसटून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पोलिसांची मजबूत पकडीतून त्याला त्याची सुटका करून घेता आली नाही. पोलिसांनी या चोरट्याला धरत थेट जवळच्या वॉशिंग सेंटरमध्ये नेते आणि त्याला पाण्याने धुवत त्याची चांगलीच धुलाई केली. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. अशोक या चोरट्याला अटक केल्यावर त्याने कुठून कुठून जनावरे चोरी केली आहेत याची माहिती उदगीर पोलिस घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर हा भाग महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील आहे. या ठिकाणी अशोक नामक चोरटा गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय होता. जनावरे चोरण्यात त्याचा हातखंडा होता. उदगीर तालुक्यातील अनेक गावांतून त्याने जनावरे, म्हशींची चोरी केली आहे. तसेच कर्नाटक राज्यातील काही सीमाभागतील गावांमधून देखील त्याने जनावरे चोरल्या आहेत. आता पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.