मनोज जरांगे यांच्या नंतर लक्ष्मण हाके यांच्या कडूनही उपोषणाची घोषणा:जशात तसे उत्तर देण्याचा ओबीसी समाजाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा उपोषणवजा संघर्ष सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री बारा वाजेपासून आपण उपोषण सुरू करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात येत असल्याची घोषणाच लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मराठवाड्यातील 25 आमदार पाडणार मराठवाड्यामध्ये 25 आमदार ओबीसी समाजाकडून पाडण्यात येणार आहेत .आमच्याकडे या आमदारांची यादी देखील तयार झाली आहे. त्यामुळे आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवर उतरू लागले असल्याचेही हाके यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेत ताकतीने ओबीसी समाज उत्तर देईल, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. जरांगे यांना भेटलेल्या आमदारांची यादी तयार विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार, एकनाथ शिंदे आणि काँग्रेस यांना ओबीसी समाज मोठा दणका देणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. जे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटले, त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवणार असल्याचा इशारा हाके यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या दबावाखाली त्यांच्या वाटेल त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… पंकजा मुंडे राहुल गांधींवर बरसल्या:त्यांच्या पोटातील विचार ओठावर आल्याची टीका; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही प्रतिप्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा’ आंदोलन करणार आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात “भारतात निष्पक्षता आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. पूर्ण बातमी वाचा…

​मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा उपोषणवजा संघर्ष सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री बारा वाजेपासून आपण उपोषण सुरू करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात येत असल्याची घोषणाच लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मराठवाड्यातील 25 आमदार पाडणार मराठवाड्यामध्ये 25 आमदार ओबीसी समाजाकडून पाडण्यात येणार आहेत .आमच्याकडे या आमदारांची यादी देखील तयार झाली आहे. त्यामुळे आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवर उतरू लागले असल्याचेही हाके यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेत ताकतीने ओबीसी समाज उत्तर देईल, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. जरांगे यांना भेटलेल्या आमदारांची यादी तयार विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार, एकनाथ शिंदे आणि काँग्रेस यांना ओबीसी समाज मोठा दणका देणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. जे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटले, त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवणार असल्याचा इशारा हाके यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या दबावाखाली त्यांच्या वाटेल त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… पंकजा मुंडे राहुल गांधींवर बरसल्या:त्यांच्या पोटातील विचार ओठावर आल्याची टीका; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही प्रतिप्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा’ आंदोलन करणार आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात “भारतात निष्पक्षता आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. पूर्ण बातमी वाचा…  

Share