बीडच्या खांडे पारगावमध्ये महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक:शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा – राजेंद्र आमटे

बीडच्या खांडे पारगावमध्ये महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक:शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा – राजेंद्र आमटे

खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या वतीने महावितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे करण्यात आले. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाची राख रांगोळी होत आहे. विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनी मुळे डोळ्या देखत पीक करपून चालली आहेत. इ 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा या महिन्यात आहेत विद्यार्थांना अभ्यास करता येते नाही. माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे. यामुळे खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, अंथरवान प्रिंपी, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, उमरी, अंथरवान प्रिंपि तांडा येथील सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शने आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देऊन शेतकऱ्यांचा तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा, शासन नियमनुसार शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्या, सात गावांसाठी मजूर 5 M.v.p. ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसावा, नवीन सबस्टेशन मंजूर करा, इंजि. भागा नगरे यांची तत्काळ बदली करा, विद्युत पुरवठा सुरळीत होई पर्यंत पूर्वी प्रमाणे एम.आय. डी. सी. मधून विद्युत पुरवठा करा, या वरील मागण्यासाठी सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शनं आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देण्यात आले. या वेळी शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत तत्काळ मागण्या करण्यात यावी, असे शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, जालिंदर सोळुंके, खाजाभाई पठाण आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment