बंगळुरूजवळ कंटेनर कारवर उलटला:सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा करुण अंत, नाताळ सुट्टीसाठी येत होते गावी
बंगळुरू जवळ एक कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटेत कारमधील आयटी इंजिनिअरसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा करुण अंत झाला. हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी येथील आहे. हे कुटुंब नाताळच्या सुट्टीनिमित्त गावाकडे येत होते. परंतु, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्या मुली, 16 वर्षांचा मुलगा, पती-पत्नी आणि भावाच्या पत्नीचा समावेश आहे. बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ शनिवारी ही दुर्घटना घडली. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होते. नाताळनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ कुटुंब KA 01 ND 1536 व्होल्वो कारने कारने मोराबागी गावाकडे येत होते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग 48 वर तळकेरेजवळ आल्यानंतर एक अवजड मालवाहू कंटेनर कारवर पलटी झाला. कंटेनर कारवर पलटल्याने या अपघातात कारचा चुराडा झाला. 3 महिन्यांपूर्वीच घेतली होती कार चंद्रम इगाप्पागोळ (वय ४६), चंद्रम यांच्या पत्नी धोराबाई (वय ४०) मुलगा गण (वय 16), मुली दिक्षा (वय 10) आणि आर्या (वय 6) तर चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात इगाप्पागोळ यांचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच चंद्रम इगाप्पागोळ यांनी कार घेतली होती. आता या अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून अधिक तपास केला जात आहे. या अपघात प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा… ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस दरीत कोसळली:5 प्रवासी जागीच ठार, 14-15 जण जखमी; घाटातील धोकादायक वळणावर घडली घटना ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर शुक्रवारी एक बस दरीत कोसळली. त्यात 5 वऱ्हाडी जागीच ठार झाले असून, 14 ते 15 जण जखमी झालेत. अपघातग्रस्त बस चाकण येथून महाडला जात होती. अपघातावेळी बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी होते अशी माहिती आहे. सविस्तर वाचा…