पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीमा सखी योजना सुरू:प्रत्येक गोष्टीला व्होट बँकेने तोलणारेलोक आजकाल खूप त्रस्त- पंतप्रधान
प्रत्येक गोष्टीला व्होट बँकेच्या तराजूत तोलणारे लोक आजकाल खूप त्रस्त आहेत. प्रत्येक निवडणुकीत मोदींवर माता, बहिणी, मुलींचा आशीर्वाद का वाढतोय हेच त्यांना कळेनासे झाले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. मोदींच्या हस्ते पानिपतमध्ये एलआयसीच्या ‘बीमा सखी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने मोदींनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी पुढे म्हणाले, आज ९ तारीख आहे. शास्त्रात ९ अंक शुभ मानला जातो. ९ डिसेंबरला घटना समितीची पहिली बैठकही झाली. हरियाणाने ‘एक हंै तो सेफ हंै’ हे अंगीकारलेे. ते खरोखरच अनुकरणीय आहे. परंतु व्होट बँकेच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्यांनी माता-भगिनींना व्होट बँक मानले आहे. त्यांना हे नाते समजू शकणार नाही. १० वर्षांपूर्वी माता-भगिनींकडे शौचालय नव्हते. गॅस नव्हता. मोदींनी दोन्ही गोष्टी दिल्या. महिला घराच्या मालकीण आहेत. ३० कोटी महिलांचे बँक खाते आहे. खाते नसते तर त्यांना अनुदान कसे मिळाले असते?
डेमोक्रसी, डेमोग्राफी, डेटा, डिलिव्हरीची शक्ती जयपूर| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरमध्ये रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचे उद्घाटन केले. ते म्हणाले, भारताच्या प्रगतीमध्ये डेमोक्रसी, डेमोग्राफी, डिजिटल डेटा व डिलिव्हरीची प्रमुख भूमिका आहे. आगामी काळात जगाला या घटकांची खरी शक्ती दिसेल. राजस्थान रायझिंग आहेच. शिवाय रिलायबल व रिसेप्टिव्हही आहे. स्वत:ला रिफाइनही करते. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले, संमेलनापूर्वी ३५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. तीन वर्षांत स्टायपंेड म्हणून दर महिन्याला वेतन पंतप्रधान म्हणाले, बीमा सखी योजनेत दोन लाख महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. तीन वर्षे आर्थिक मदत मिळेल. विमा क्षेत्रातील डेटानुसार दर महिन्याला एजंट १५ हजार रुपये कमावतो. विमा सखी वर्षात पावणेदोन लाख रुपये कमावू शकेल.