भाजप – 33 आमदारांनी केली 134 कोटींची मालमत्ता खरेदी:जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकरांची जमीन खरेदीसाठी डेहराडूनला पसंती
शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि ५ अपक्ष आमदार आले. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत महायुती सरकार स्थापन केले. वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. अडीच वर्षे विरोधी पक्षात बसलेला भाजप पुढील अडीच वर्षे सत्ताधारी झाला. या काळात भाजपच्या १०५ पैकी ३३ अामदारांनी तब्बल १३४ काेटी रुपयांची संपत्ती खरेदी केली.
भाजपच्या आमदारांपैकी बहुतांशी जणांना यंदा परत उमेदवारी मिळाली. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून बंडखोरीनंतरच्या अडीच वर्षात त्यांनी खरेदी केलेली मालमत्तेचा तपशील समोर आला. शहरी भागातील आमदारांनी फ्लॅट, प्लॉट आणि आलिशान वाहने तर ग्रामीण भागातील आमदारांनी शेती विकत घेतली. यात एकट्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्नीच्या नावावर तब्बल ४८ कोटी रुपयांची जमीन विकत घेतली. जिंतूरच्या मेघना बोर्डीकरांनी डेहराडूनमध्ये जमीन खरेदी केली. भाजपच नव्हे तर सर्वपक्षीय उमेदवारांत सर्वात श्रीमंत असलेले पराग शहा यांनी घाटकोपर येथे पत्नीच्या नावाने २ ऑफिस खरेदी केले. त्यावर २ कोटी ९ लाख रुपये खर्च केले आहेत. आ. नारायण कुचे २.४५ तर मंत्री महाजनांची २.३४ कोटींची खरेदी नारायण कुचे, बदनापूर : २.४५ कोटी गिरीश महाजन, जामनेर : २.३४ कोटी हरीश पिंपळे, मुर्तीजापूर : २.३२ कोटी मेघना बोर्डीकर, जिंतूर : २.०१ कोटी प्रशांत ठाकूर, पनवेल : १.७५ कोटी रवींद्र चव्हाण, डोंबिवली : १.७१ कोटी श्वेता महाले, चिखली : १.६२ कोटी.