Category: marathi

मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आमदार संजय शिरसाट यांनी उबाठाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. भाजपच्या...

युगेंद्र पवारांकडून आजीचे तर जय पवारांकडून श्रीनिवास पवारांचे आशीर्वाद:बारामतीमध्ये पुन्हा लोकसभेचा कित्ता की दादांना संधी?

युगेंद्र पवारांकडून आजीचे तर जय पवारांकडून श्रीनिवास पवारांचे आशीर्वाद:बारामतीमध्ये पुन्हा लोकसभेचा कित्ता की दादांना संधी?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांची पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आज मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात आपल्या आजीचे आशीर्वाद घेतले. तर दुसरीकडे जय पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांचे वडील आणि आपले काका श्रीनिवास पवार...

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील:जय पवार यांचा दावा; तेच किंगमेकर राहणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील:जय पवार यांचा दावा; तेच किंगमेकर राहणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केला आहे. आगामी निकालानंतर अजित पवार हे राज्यात किंग मेकर असतील. तसेच तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे जय पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात...

राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:’अमित’च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन

राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:’अमित’च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन

आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माहिम...

दिव्य मराठी अपडेट्स:‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

दिव्य मराठी अपडेट्स:‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची आज प्रक्षाळपूजा, राजोपचार पूर्ववत पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची बुधवारी (20 नोव्हेंबर) प्रक्षाळपूजा होत आहे. श्रींचे 24 तास सुरू असणारे दर्शन बुधवारपासून बंद होऊन सर्व नित्य राजोपचार सुरू होणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी संपन्न झाली, तर 4 नोव्हेंबरपासून श्रींचा...

महाराष्ट्राच्या 288 जागांवर मतदान सुरू:दुपारी 1 पर्यंत 32.18% मतदान; सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्राच्या 288 जागांवर मतदान सुरू:दुपारी 1 पर्यंत 32.18% मतदान; सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारपी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 27.73% मतदान झाले. राज्यात एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा...

हिंदूंमध्ये देवता आराधनेतून हिंदुत्व येईल:जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचे प्रतिपादन

हिंदूंमध्ये देवता आराधनेतून हिंदुत्व येईल:जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचे प्रतिपादन

सर्व जीवांमध्ये परमेश्वराने केवळ माणसालाच धर्मपालनाची शक्ती प्रदान केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने धर्मपालन करीत राहणे आवश्यक आहे. धर्मपालन कार्यात आपण वेदांचा आश्रय घेतो. वेदांमध्ये काय करावे, काय नाही, हे दिलेले आहे. हिंदूंमध्ये देवता आराधना व उपासनेतूनच हिंदुत्व येईल, असे अनंतश्रीविभूषित पश्चिमान्माय द्वारका शारदापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण...

विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा नव्हती:अत्यंत दुर्दैवी घटना.. स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न, मविआच्या नेत्यांकडून टीका

विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा नव्हती:अत्यंत दुर्दैवी घटना.. स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न, मविआच्या नेत्यांकडून टीका

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील विनोद तावडे आणि भाजप महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई...

विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप:म्हणाले – मी 40 वर्षांपासून राजकारणात, कुणी काहीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही

विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप:म्हणाले – मी 40 वर्षांपासून राजकारणात, कुणी काहीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही

नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे यांना पैसे वाटत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे नेते व उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तसेच यावेळी हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील उपस्थित होते. क्षितिज नाईक यांनी जेव्हा हॉटेलचा तपास केला तेव्हा अनेक खोल्यांमधून लाखांच्या घरात पैसे सापडत होते. यानंतर हितेंद्र ठाकूर...

अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा:अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणे कारणीभूत, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा:अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणे कारणीभूत, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला होता. या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर पसरत असल्याचे दिसत आहे. नरखेड येथून प्रचारसभा आटपून काटोलकडे परतत असताना बेला फाट्याजवळ अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले. यावर आता ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख हल्लाप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम...