Category: marathi

‘वंचित’च्या एन्ट्रीने आव्हाड यंदा धोक्याच्या रेषेवर उभे:दलित, मुस्लिम मतविभागणीने महायुतीला फायद्याची चिन्हे

‘वंचित’च्या एन्ट्रीने आव्हाड यंदा धोक्याच्या रेषेवर उभे:दलित, मुस्लिम मतविभागणीने महायुतीला फायद्याची चिन्हे

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतो. तेथे दलित, मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवून आव्हाडांनी नेहमी यश मिळवले आहे. आता राष्ट्रवादीत फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. अजित पवारांनी येथे आव्हाडांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक नजीम मुल्ला यांना महायुतीतर्फे मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मुस्लिम मते विभागली जातील. वंचित बहुजन आघाडीचे पंढरीनाथ गायकवाड दलितांची मते काही प्रमाणात घेऊ शकतात. तशी...

भाजपने 33 जागांवर व्होट जिहाद रोखण्यासाठी आखली व्यूहरचना:एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार रिंगणात

भाजपने 33 जागांवर व्होट जिहाद रोखण्यासाठी आखली व्यूहरचना:एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार रिंगणात

राज्यात २०% च्या वर मुस्लिम लोकसंख्या असलेले ३३ विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे व्होट जिहादचा भाजपला थेट मोठा फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी मुस्लिम मतविभाजनाची भाजपने व्यूहरचना केल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या मतदारसंघांमध्ये जिंकायचे असेल तर मतविभाजन हा एकमेव पर्याय उरतो. अशा वेळी तिथे वेगवेगळ्या माध्यमातून अपक्ष म्हणून एकापेक्षा अधिक मुस्लिम उमेदवार उभे करणे हाच पर्याय...

आदिवासी समाजाचे 25 आमदार विजयी होण्याची गॅरंटी:25 राखीवखेरीज राज्यातील 38 मतदारसंघांवर आदिवासी समाजाचे वर्चस्व

आदिवासी समाजाचे 25 आमदार विजयी होण्याची गॅरंटी:25 राखीवखेरीज राज्यातील 38 मतदारसंघांवर आदिवासी समाजाचे वर्चस्व

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यात ९ ते १० टक्के आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे. या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आहे. या प्रवर्गाची लोकसंख्या १३ वर्षांपूर्वी १ कोटी ५ लाख १० हजार २१३ होती. त्यात आता १० ते १२ लाखांची भर पडली असावी, असे जाणकारांचे मत आहे. आदिवासींसाठी विधानसभेच्या २५ जागा राखीव आहेत. त्याशिवाय ३८ मतदारसंघांवर आदिवासी समाज वर्चस्व राखून आहे. येथे...

देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर

देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका… सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष… राज्याच्या राजकारणात सध्या सर्वांच्याच केंद्रस्थानी एक नाव कायम आहे… ते म्हणजे देवेंद्र फडणवीस…. तब्बल 40 वर्षानंतर आपला पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रातील राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. त्यांच्या या कार्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. 31 ऑक्टोबर 2014...

शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत:कसब्याच्या प्रचार सभेत राज ठाकरे यांची टीका

शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत:कसब्याच्या प्रचार सभेत राज ठाकरे यांची टीका

गेल्या पाच वर्षातील राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणे पाहता किळस येते आहे. कोण कोणाच्या मांडीवर बसतेय, याचा थांगपत्ता लागत नाही. मते एकाच्या नावाने मागायची आणि सत्ता वाटेल त्या पद्धतीने उपभोगायची, अशी स्थिती सध्या आहे. हे असेच चालू राहिले, तर येत्या काळात महाराष्ट्राचे आणखी वाटोळे होईल. फोडाफोडीच्या या राजकारणाचे शरद पवार हे आद्यसंत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...

भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान:लाडकी बहिणीचे पैसे घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर फोटो काढा, त्यांची व्यवस्था करतो

भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान:लाडकी बहिणीचे पैसे घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर फोटो काढा, त्यांची व्यवस्था करतो

भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असे चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत. असे विधान कोल्हापूरच्या प्रचार सभेत बोलताना महाडिक यांनी...

शरद पवार आणि दाऊदची भेट झाली आहे:प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा, तपास करण्याची केली मागणी

शरद पवार आणि दाऊदची भेट झाली आहे:प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा, तपास करण्याची केली मागणी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसे पुरवण्याचे काम जगभरातून सुरू होते. 1900 ते 2000 या काळात देशात ब्लास्ट होत गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्या...

पुण्यात धक्कादायक घटना:अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पुण्यात धक्कादायक घटना:अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दोन दिवसांवर आलेली दहावीची परीक्षा आणि अभ्यासाचा ताण यामुळे एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मोहम्मद वाडी परिसरात घडली. रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी सात ते रात्री नऊच्या सुमारास घडली. रेहा वर्गीस हीने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाची माहिती डॉक्टर उमा...

काँग्रेसने फक्त शिक्षण संस्था वाटल्या:विकासाला प्राधान्य दिले नाही, नितीन गडकरी यांची टीका

काँग्रेसने फक्त शिक्षण संस्था वाटल्या:विकासाला प्राधान्य दिले नाही, नितीन गडकरी यांची टीका

भाजप पक्ष हा मोदी किंवा गडकरींचा नाही,तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहेत.७५ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नाही, फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले.त्यांच्या सोबतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते, त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका कारंजा घाडगे येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भाजपचे सुमित वानखेडे यांच्या...

महिलेचा खून करून मृतदेह पलंगातील कप्यात लपवला:पती घरी आल्यावर घटना उघडकीस आली, आरोपीचा शोध सुरू

महिलेचा खून करून मृतदेह पलंगातील कप्यात लपवला:पती घरी आल्यावर घटना उघडकीस आली, आरोपीचा शोध सुरू

कारचालक पती गावी गेल्यानंतर घरात एकट्या राहत असलेल्या महिलेचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे. सदर महिलेच्या खुनामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक काॅलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी,पुणे ) असे खून झालेल्या मयत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली यांचा...