Category: marathi

मतदानापूर्वी महाराष्ट्र तापला:अनिल देशमुख अन् वंचितच्या उमेदवारांसह चौघांवर हल्ला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

मतदानापूर्वी महाराष्ट्र तापला:अनिल देशमुख अन् वंचितच्या उमेदवारांसह चौघांवर हल्ला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्यात वातावरण तापवण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक उमेदवारांवर तसेच त्यांच्या कौटुंबियांवर देखील हल्ले करण्याच्या घटना राज्यभरात अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के, भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड, अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. माजी...

एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाचा दणका:24 तासाच्या आत उत्तर देण्याचे आदेश; तर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाचा दणका:24 तासाच्या आत उत्तर देण्याचे आदेश; तर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी शिवसेनेकडून छुप्या मार्गाने प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या विरोधात काँग्रेसने तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने तत्काळ दखल घेत 24 तासाच्या आत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे....

मतदानाआधीच आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?:कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवल्याचा आरोप; फुलंब्रीमधील धक्कादायक प्रकार

मतदानाआधीच आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?:कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवल्याचा आरोप; फुलंब्रीमधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आता अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक कर्मचारी नेमले जातात तसेच प्रत्येक मतदारसंघात इलेक्शन ड्यूटी बजावण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. तशीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी विधानसभा मतदारसंघात देखील करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना एवढे काम करूनही जेवण न मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील घरून डबा...

प्रचाराची वेळ संपल्यानंतरही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची कॉर्नर सभा:कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

प्रचाराची वेळ संपल्यानंतरही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची कॉर्नर सभा:कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोसंबी गावात 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भाजप-महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांसोबत कॉर्नर सभा घेतली. या सभेची माहिती कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांना मिळाली व तातडीने रावत त्यांच्या समर्थकांसोबत कोसंबी गावातील सभास्थळी पोहचले. संतोष रावत सभास्थळी पोहोचले तेव्हा कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, प्रचार संपल्यानंतर गावात सभा...

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये मध्यरात्री सर्च ऑपरेशन:बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये मध्यरात्री सर्च ऑपरेशन:बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलेले आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवर मध्यरात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकांचा प्रचार संपला असला तरी देखील मतदानादरम्यान बऱ्याच...

भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीणीवर हल्ला:हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी, उपचारासाठी अमरावतीत दाखल

भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीणीवर हल्ला:हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी, उपचारासाठी अमरावतीत दाखल

अमरावती येथील धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले सातेफळ फाट्यावर रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री अर्चना रोठे प्रचार संपवून परतत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अर्चना रोठे यांची...

आपले हिंदुत्व कळल्यावर मुस्लिम आपल्यासोबत:ख्रिश्चन समाजाचाही पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केला विश्वास व्यक्त

आपले हिंदुत्व कळल्यावर मुस्लिम आपल्यासोबत:ख्रिश्चन समाजाचाही पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केला विश्वास व्यक्त

आपले हिंदुत्व कळल्यामुळे मुसलमान आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू देखील आपल्याकडे येऊन पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक दिवस बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदुत्व काय आहे, हे कळल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत आहेत. सगळ्या समाजाचे लोक आपल्यासोबत आले....

अनिल देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न:खासदार संजय राऊत यांचा भाजप तसेच फडणवीसांवर निशाणा; हल्लेखोर भाजपच्या घोषणा देत असल्याचा दावा

अनिल देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न:खासदार संजय राऊत यांचा भाजप तसेच फडणवीसांवर निशाणा; हल्लेखोर भाजपच्या घोषणा देत असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला पाहिला तर त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला झाला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते तर दुसरीकडे माजी गृहमंत्र्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न...

दिव्य मराठी अपडेट्स:वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले

दिव्य मराठी अपडेट्स:वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले ​​​​​​​हिंगोली – ​​​​​​​हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या...

कर्जमाफी, हमीभाव राजकीय दिशा बदलणार:शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला मिळणारा अल्प भाव हे दोन निवडणुकीत ज्वलंत मुद्दे

कर्जमाफी, हमीभाव राजकीय दिशा बदलणार:शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला मिळणारा अल्प भाव हे दोन निवडणुकीत ज्वलंत मुद्दे

शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला मिळणारा अल्प भाव हे दोन मुद्दे या निवडणुकीत ज्वलंत आहेत. मराठवाडा, विदर्भात शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यांना कर्जमाफीच्या निर्णयाने दिलासा मिळू शकतो. मात्र पिकांना हमीभाव मिळत नसल्याचा रोषही व्यक्त होऊ शकतो. उत्पन्नात घट, अल्प भाव, खरेदीचा अभाव, ९५ मतदारसंघांत शेतकऱ्यांची कापूस कोंडी विकास पाटील | छत्रपती संभाजीनगर सोयाबीनपेक्षा कपाशीची परिस्थिती फारच बिकट आहे. कमी भावात...