सतरंजीने हातपाय बांधून बेदम मारहाण:12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची केली चोरी, बीडमधील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई
बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. केज तालुक्यातील विडा येथे अवादा पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला सतरंजीने हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच रोटर केबल, स्टार्टन केबल, आर्थिंग केबल असे एकूण 12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची घटना 7 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यावर कारवाई करत...