छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये भीषण अपघात:उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये भीषण अपघात:उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पिशोर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. उसाच्या ट्रक खाली 17 मजूर दबले असून त्यातील 13 जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरिकांनी जखमी मजूरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-पिशोर मार्गावर रात्री 12 वाजेच्या सुमारास एका उसाच्या ट्रकवर बसून 17 मजूर प्रवास करत होते. हा ट्रक अचानक उलटल्याने 17 मजूर उसाखाली दबले. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळाल्याने त्यांनी बचाववासाठी धाव घेतली. यात 13 जणांना वाचिवण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने चार जणांचा मृत्यू झाला. तर जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नेमका अपघात कसा झाला याबद्दल पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यप्रदेशातही भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात सोमवारी भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि SUV यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment