मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये:केंद्राचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये:केंद्राचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकपणा यावर अधिक भर देण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत. याचसोबत केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय आणि पाठपुराव्याची व्यवस्था करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हणाले, केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजे. आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालवा. पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात प्रवास तत्काळ सुरू करावे. आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून द्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना सांगितले आहे. लोकांना घरबसल्या सेवा मिळतील याकडे लक्ष द्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करून ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या लोकांना कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. सर्व संकेतस्थळ आरटीआय फ्रेंडली करा. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येणार असल्याचे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. महाराष्ट्र नंबर 1 वर आहे म्हणून थांबू नका
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्या. त्यांचा सचिवांशी थेट संवाद आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापन द्या. महाराष्ट्र हे असीमित ताकदीचे राज्य आहे, आपण नंबर 1 वर आहोत म्हणून थांबू नका. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा. 100 दिवसांचे कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment