मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस लक्ष घालणार:व्होट जिहादसाठी 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस लक्ष घालणार:व्होट जिहादसाठी 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मालेगाव येथील नामको बँक, मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या 14 तरुणांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मालेगाव येथे 100 कोटी रुपये ‘व्होट जिहाद’ साठी वापरण्यात आले असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. मालेगाव येथे पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले, 11 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामको बँक, मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या 14 तरुणांची भेट घेणार आहेत. या तरुण विद्यार्थ्यांची सिराज अहमदने व्होट जिहादसाठी फसवणूक केली आहे. जयेश मिसाळ यांच्या घरी मइ जाऊन आलो. हा खूप मोठा घोटाळा असून नामको बँक व इतर बँकमधून हा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, एकट्या मालेगावातून 100 कोटी रुपये ‘व्होट जिहाद’साठी वापरले गेले. मौलाना सज्जाद नोमानी, मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. त्यांनी व्होट जिहाद अभियान चालवण्यासाठी ते 100 कोटी वापरले आहेत. अक्रम अहमद, अब्दुल मेहमूद भगाड यांच्यासह 27 जणांच्या खात्यावर हा पैसा ट्रान्स्फर झालाय. नाशिक मर्चंट बँकेसह इतरही बँकांमधून हा घोटाळा झालेला आहे, असा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, 1000 कोटींचा घोटाळा असून 600 कोटी दुबई येथे गेलेत. तर काही बँकेतून काढण्यात आले आहेत. 100 कोटी रुपये ऑक्टोबरमध्ये व्होट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांच्या खात्यावर गेलेत. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात कारवाई केलेली नाही. 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नातानी, शेख शहाबाज, जाफरभाई नबिमुल्ला, अमीन वाघरिया, अब्दुल कादीर भगाड, असे 27 सिराज मोहम्मद अँड गँगच्या खात्यातून 114 कोटी जमा झालेत. ही व्याप्ती खूप मोठी असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यात लक्ष घालत आहेत. मौलाना सज्जाद नोमानी, मराठी मुस्लिम सेवा संघ, मुस्लिम उलेमा बोर्ड यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. या संस्था रेकॉर्डला नाही, संस्थेत रुपया नाही. त्यांना पैसे मालेगावातून गेले. 21 राज्यात हे व्यवहार झाले आहेत आणि एकूण 47 ब्रांचमध्ये चौकशी होणार आहेत. मेहमूद भगाड हा मास्टर माईंड असून 1000 कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा आहे. या व्होट जिहाद प्रकरणाचा मेहमूद भगाड प्रमुख आहे, सिराज हा केवळ एक एजंट आहे. व्होट जिहादचे नेते व प्रचारक यांना हे पैसे वाटण्यात आले. तसेच लूक आऊट नोटीस देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment