मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे:खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांवर टीका
महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना वाढत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत हे सर्व सुरू असताना मुंबई पोलिस, आयुक्त आणि पोलिस महासंचालक काय काम करत आहेत? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात त्यांनी गृहमंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल किंवा मुंबईत वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला हल्ला असेल, या सर्व घटना दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जबर राहिलेला नाही. परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे, या सर्व परिस्थितीमुळे गृह विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखादा व्यक्ती घरात घुसतो आणि घरातील व्यक्तीवर वार करतो, अशावेळी मुंबई पोलिस काय काम करते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृह विभाग काम करतोय का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. गृहमंत्रालय अशावेळी काय करतेय? अलीकडच्या काळात सलमान खान यांच्या घराबाहेर देखील गोळीबार झाला आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. ज्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था आहे, अशा प्रतिष्ठित व्यक्तीच जर सुरक्षित नसतील तर सामान्य व्यक्तींचे काय? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्रालय अशावेळी काय करतेय? त्यांचे काय सुरू आहे? असा सवाल त्यांनी गृह विभागाला विचारला आहे. राज्यामध्ये पोलिसांचे खच्चीकरण सुरू मुंबई पोलिसांचे राज्यामध्ये खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये हे सातत्याने घडत आहे. त्यामुळे या संदर्भात गृहमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबईत व्हीआयपी नागरिक देखील सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांची स्थिती काय असेल? असा सवाल उपस्थित करत वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नेमके प्रकरण काय? बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी सांगतात की, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा खोल आहेत. पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. खासदार सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन:काही मदत करू शकत असेल तर… कुटुंबीयांना दिला दिलासा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सैफ अली खान याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन केला. मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा, मी लगेचच मदत करेल, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…