धोरणकर्ते राज्य सरकार देखील अतिरेकी:राजू शेट्टी यांची टीका; म्हणाले- औकात नव्हती तर कर्ज माफीचे खोटे आश्वासन का दिले?

धोरणकर्ते राज्य सरकार देखील अतिरेकी:राजू शेट्टी यांची टीका; म्हणाले- औकात नव्हती तर कर्ज माफीचे खोटे आश्वासन का दिले?

राज्य सरकारची शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची औकात नव्हती, तर त्यांनी निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करण्याचे आश्वासन का दिले? असा प्रश्न शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारे राज्यातील धोरण ठरवणारे सरकार देखील अतिरेकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला, त्याचा संपूर्ण देशाने निषेध केला. जगभरातून देखील त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली आहेत. त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र, ज्या लोकांच्या धोरणामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. ते सुद्धा अतिरेकीच आहेत. त्यांचे धोरण सुद्धा अतिरेकी धोरण आहे. त्यांना कोणी जाब विचारायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या वेळी राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र शेतकऱ्यांना एक विनंती देखील केली. आता मारायचे नाही, तर जाब विचारायचा असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. हे धोरण आल्यावर लादले गेले आहे. त्यामुळे आपली शेती कर्जबाजारी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र उत्पन्न कमी होत जात आहे. मात्र आता मरायचे नाही, तर त्याचा जाब विचारायचा, असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केले आहे. तुमच्या औकात नव्हती, तुमची लायकी नव्हती, तुम्हाला जमत नव्हते तर तुम्ही आमचे कर्ज माफ करतो, असे खोटे आश्वासन का दिले? असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी जिथे महायुतीचे नेते दिसतील तिथे जाऊन त्यांना विचारा, असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. नेत्यांना जाब विचारला तर मंत्र्यांच्या दौऱ्या वेळी स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांची धरपकड होईल. मात्र, अशा वेळी शेजारच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते येतील. मात्र, तुमचे दौरे आता आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नसता तुमची सुटका नसल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. नेमके काय म्हणाले राजू शेट्टी ते देखील पहा…. राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. दररोज सात ते आठ शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतक-यांच्या वेदना आंधळ्या व बहि-या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माळसोन्ना येथून पदयात्रा काढण्यात आली. परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे १५ दिवसापुर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव व त्याच्या ७ महिन्याच्या गर्भवती पत्नीने एकाच दिवशी आत्महत्या केली. जावई आत्महत्या केल्याने विधवा मुलींची कसे पालनपोषण कसे करायचे या विवंचनेत याच गावातील भगवान टाकळे या शेतक-याने आत्महत्या केली. यासारख्या दररोज वेगवेगळ्या आत्महत्या महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत. मात्र राज्यातील संवेदनहिन राज्यकर्ते याकडे सोईस्कर दुर्लक्ष करू लागले आहे. यामुळे महाराष्ट्र ही शेतकरी आत्महत्येची स्मशानभुमी झालेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे. देशातील ६.५० लाख हेक्टर त राज्यातील ३.५० लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदारक चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात -निर्यात धोरण , नैसर्गिक आपत्ती , सततची नापिकी , पिकविमा कंपन्यांची नफेखोरी , दुष्काळ , महापूर , अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्यकर्त्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास देशातील १५० कोटीहून अधिक जनतेला दोन वेळ पुरेल एवढे धान्य निर्मीती थांबल्यास भुकबळीची संकट देशावर यायला वेळ लागणार नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment