दिव्य मराठी अपडेट्स:बीडमधील आष्टीत शाळेच्या बसला भीषण अपघात, 12 विद्यार्थी जखमी; शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स मंगेशकर रुग्णालयाने 6 वर्षात रुपयाही कर भरला नाही गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोप होत असलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणखी एका गोष्टीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या सहा वर्षात रुग्णालयाने एक रुपयाचा कर देखील भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. सविस्तर वाचा आष्टीत बसच्या अपघातात 12 विद्यार्थी जखमी बीडमधील आष्टीत शाळेच्या बसला अपघात झाल्याने 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात हा अपघात झाला आहे. स्कूल बस आणि कार यांच्यात अपघात होऊन स्कूलबस झाडावर आदळली. उदय सामंत सकाळी सकाळी राज ठाकरेंच्या भेटीला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा सैफ अली खान हल्ला प्रकरण – तिन्ही तुकडे एकाच चाकूचे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी शरीफुल इस्लामच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) च्या अहवालात मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींकडून जप्त केलेला चाकूचा तुकडा, गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला तुकडा आणि सैफच्या मणक्यातून काढलेला तुकडा, हे तिन्ही एकाच चाकूचे आहेत. सविस्तर वाचा शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. तीन दिवसीय रामनवमी उत्सव असणार आहे. यंदा उत्सवाचे 114वे वर्ष असून मोठ्या संख्येनं पायी पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत.