दिव्य मराठी अपडेट्स:छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने महिलेला चिरडले

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात PI कुरुंदकरला जन्मठेप पनवेल सत्र न्यायालयाने बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे लाकूड कापण्याच्या कटरने अश्विनीचे तुकडे करणाऱ्या कुरुंदकरचे उर्वरित आयुष्य गजाआड जाणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणातील कुंदन भंडारी व महेश पार्डीकर या इतर दोन आरोपींनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पण या दोघांनी शिक्षेचा कालावधी तुरुंगात काढल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा नाशिकच्या पाणी प्रश्नावर वडेट्टीवारांनी ठेवले बोट घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणे. पाण्यासाठी जर जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरतावे लागत असेल तर हा कसला विकास असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सविस्तर वाचा मनसेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्रात चांगलेच महाभारत रंगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हिंदीचे समर्थन केल्यानंतर मनसेने त्यांना राज्यातील इंग्रजी शाळा बंद करण्याचे आव्हान दिले आहे. सविस्तर वाचा छत्रपती संभाजीनगर: भरधाव कारने महिलेला चिरडले छत्रपती संभाजीनगरमधील पैठण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने एका महिलेला चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर कार चालक फरार असल्याची माहिती आहे. महिला चक्क शंभर ते दीडशे फूट उंच आणि लांब हवेत उडाली आणि खाली आदळली. भाजपची राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात बॅनरबाजी ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही तर भाषा जोडते असे भाजपचे बॅनर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा असताना भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा छत्रपती संभाजीनगर: भरधाव कारने महिलेला चिरडले छत्रपती संभाजीनगरमधील पैठण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने एका महिलेला चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर कार चालक फरार असल्याची माहिती आहे. महिला चक्क शंभर ते दीडशे फूट उंच आणि लांब हवेत उडाली आणि खाली आदळली. हिंगोलीत हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली, 2 लाख लंपास हिंगोली शहरालगत खटकाळी हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम पळविली आहे. यावेळी तेथील रखवालदारास चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तर सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला करून त्यांनी हे कृत्य केले. सविस्तर वाचा भाजपने राजकारणात विष पेरण्याचे काम केले- ठाकरे गट भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले असे म्हणत ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा महाराष्ट्रातील चंद्रपूर देशातील सर्वात उष्ण जिल्हा देशभरात उष्णतेची लाट सुरूच आहे. रविवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा 44.6 अंशांसह देशातील सर्वात उष्ण होता. राजस्थानमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली, परंतु पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे. सविस्तर वाचा सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 79,000 वर शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 79,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, निफ्टी देखील सुमारे 150 अंकांनी वाढला आहे आणि 24,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्स दबावाखाली व्यवहार करत आहेत. सविस्तर वाचा