दिव्य मराठी अपडेट्स:धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदा एकाच मंचावर, दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… भंडारा: आगीत घरातील साहित्य जळून खाक, 10 लाखांच्या नुकसानीचा दावा भंडारा: अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुंथारा येथे घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजेदरम्यान घडली. विलास सार्वे असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत घरातील साहित्य, रोख रक्कम, सोने व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. आगीत एकूण 10 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा विलास सार्वे यांनी केला आहे. तसेच सार्वे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बनावट शिवसेनेचे अमित शहा प्रमुख- संजय राऊत
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत अमित शहा यांनी एक शिवसेना निर्माण केली. ही बनावट शिवसेना शहा यांनी महाराष्ट्रात काही जणांना चालवायला दिली आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका बनावट वाटणारच, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपला टोला लगावला आहे. सविस्तर वाचा धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदा एकाच मंचावर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाचे आमदार सुरेश धस हे आज एकाच मंचावर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. या ठिकाणी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहे. सविस्तर वाचा 14 वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला ‘इंडियन ग्रे वुल्फ’ तब्बल 14 वर्षांच्या खंडानंतर भंडारा वनविभागाच्या रावणवाडी परिसरात ‘इंडियन ग्रे वुल्फ’ म्हणजेच भारतीय लांडगा आढळला आहे. लुप्तप्राय होत चाललेला हा लांडगा पुन्हा एकदा भंडारा परिसरात दिसल्याने वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आणि खळबळ दोन्ही निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा सेन्सेक्स 350अंकांनी घसरून 76,700 वर शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 350 अंकांनी घसरून 76,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 100 अंकांपेक्षा जास्त खाली आला आहे, तो 23,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सविस्तर वाचा