दिव्य मराठी अपडेट्स:आज ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन; सूर्योदयापासून ‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत मुहूर्त‎

दिव्य मराठी अपडेट्स:आज ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन; सूर्योदयापासून ‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत मुहूर्त‎

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर‎ – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह शिक्षण, उद्योग, साहित्य, माध्यम क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ते सुमारे अडीच तास संवाद साधतील. उच्चपदस्थ, सनदी अधिकाऱ्यांसमवेत स्नेहभोज घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या एकाही राज्यपालांनी निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने संवाद साधलेला नाही. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. दुपारी 3.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यावर तेथून सुभेदारी विश्रामगृहाकडे रवाना होतील. दुपारी 4 वाजता लोकप्रतिनिधींशी संवाद, 4.30 ते 6.30 या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी आणि संवाद होईल. रात्री 8 वाजेच्या शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील. आज गौरींचे आगमन; सूर्योदयापासून‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत असेल मुहूर्त‎ छत्रपती संभाजीनगर‎ – ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे ‎आगमन आज होणार आहे.‎ सूर्योदयापासून रात्री 8.04 ‎मिनिटांपर्यंत मुहूर्त यासाठी ‎पुरोहितांनी सांगितला आहे. सुख ,‎शांती, मांगल्य घेऊन येणाऱ्या ‎गौरींच्या स्वागतासाठी घराघरात‎ देखणी सजावट झाली आहे. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या‎ भाज्या मुबलक प्रमाणात विक्रीस ‎‎आहेत. शिवाय फुलांचा बाजारही ‎‎बहरला आहे. गौरींच्या ‎‎सजावटीसाठी आर्टिफिशियल ‎‎फ्लॉवर्सचे डेकोरेशन, मोती,‎ फुलांच्या तोरणांची सर्वाधिक खरेदी ‎‎झाली आहे. कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांनी सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात येईल. भाजपचे माजी आमदार पठारेंनी दिले पुन्हा शरद पवार गटात परतीचे संकेत पुणे – गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. तेव्हापासून पठारे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता पठारेंनीच शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तेे 2009 मध्ये वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता विधानसभा लढण्यासाठी ते स्वगृही परतणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास आजारी, आयसीयूमध्ये लखनऊ – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास (86) यांना लखनऊच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. रुग्णालयाने सोमवारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले की, त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भुमरेंच्या बंडखोरीनंतर ठाकरे प्रथमच‎पैठणला, 15 रोजी जनसंवाद मेळावा‎ पैठण – खासदार संदीपान भूमरे यांनी शिंदे गटात प्रवेश‎ केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‎‎मध्ये येत आहेत. रविवारी 15‎‎ सप्टेंबर रोजी ठाकरे यांच्या‎‎ उपस्थितीत संत एकनाथ‎‎ कारखान्याचे चेअरमन सचिन‎‎ घायाळ यांचा पक्ष प्रवेश व जनसंवाद‎‎ मेळावा येथे होत आहे. त्यामुळे ‎ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे तालुक्यातील शिंदे‎गटासह ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले‎ आहे. मेळाव्यात ठाकरे हे काय बोलणार याकडे भुमरेंसह ‎ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.‎

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर‎ – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 41 दिवसांनी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह शिक्षण, उद्योग, साहित्य, माध्यम क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ते सुमारे अडीच तास संवाद साधतील. उच्चपदस्थ, सनदी अधिकाऱ्यांसमवेत स्नेहभोज घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या एकाही राज्यपालांनी निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने संवाद साधलेला नाही. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. दुपारी 3.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यावर तेथून सुभेदारी विश्रामगृहाकडे रवाना होतील. दुपारी 4 वाजता लोकप्रतिनिधींशी संवाद, 4.30 ते 6.30 या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी आणि संवाद होईल. रात्री 8 वाजेच्या शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील. आज गौरींचे आगमन; सूर्योदयापासून‎रात्री 8.04 मिनिटांपर्यंत असेल मुहूर्त‎ छत्रपती संभाजीनगर‎ – ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे ‎आगमन आज होणार आहे.‎ सूर्योदयापासून रात्री 8.04 ‎मिनिटांपर्यंत मुहूर्त यासाठी ‎पुरोहितांनी सांगितला आहे. सुख ,‎शांती, मांगल्य घेऊन येणाऱ्या ‎गौरींच्या स्वागतासाठी घराघरात‎ देखणी सजावट झाली आहे. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या‎ भाज्या मुबलक प्रमाणात विक्रीस ‎‎आहेत. शिवाय फुलांचा बाजारही ‎‎बहरला आहे. गौरींच्या ‎‎सजावटीसाठी आर्टिफिशियल ‎‎फ्लॉवर्सचे डेकोरेशन, मोती,‎ फुलांच्या तोरणांची सर्वाधिक खरेदी ‎‎झाली आहे. कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांनी सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात येईल. भाजपचे माजी आमदार पठारेंनी दिले पुन्हा शरद पवार गटात परतीचे संकेत पुणे – गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. तेव्हापासून पठारे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता पठारेंनीच शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तेे 2009 मध्ये वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता विधानसभा लढण्यासाठी ते स्वगृही परतणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास आजारी, आयसीयूमध्ये लखनऊ – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास (86) यांना लखनऊच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. रुग्णालयाने सोमवारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले की, त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भुमरेंच्या बंडखोरीनंतर ठाकरे प्रथमच‎पैठणला, 15 रोजी जनसंवाद मेळावा‎ पैठण – खासदार संदीपान भूमरे यांनी शिंदे गटात प्रवेश‎ केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‎‎मध्ये येत आहेत. रविवारी 15‎‎ सप्टेंबर रोजी ठाकरे यांच्या‎‎ उपस्थितीत संत एकनाथ‎‎ कारखान्याचे चेअरमन सचिन‎‎ घायाळ यांचा पक्ष प्रवेश व जनसंवाद‎‎ मेळावा येथे होत आहे. त्यामुळे ‎ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे तालुक्यातील शिंदे‎गटासह ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले‎ आहे. मेळाव्यात ठाकरे हे काय बोलणार याकडे भुमरेंसह ‎ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment