पाण्याची आवक कमी झाल्याने मुळा नदीतून सोडलेल्या विसर्गामध्येही घट:जायकवाडीला आतापर्यंत 6866 सोडले दशलक्ष घनफूट पाणी

पाण्याची आवक कमी झाल्याने मुळा नदीतून सोडलेल्या विसर्गामध्येही घट:जायकवाडीला आतापर्यंत 6866 सोडले दशलक्ष घनफूट पाणी

कोतुळकडुन मुळा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने धरणातून मुळा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. बुधवारी (११ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता मुळा धरणाच्या ११ मोऱ्या दीड इंच उंचावून १ हजार क्युसेकने मुळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी ६ वाजता कोतुळकडून मुळा धरणात ९०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. १३ ऑगस्टला २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार दशलक्ष घनफूट झाल्याने जलाशय परिचलन तक्त्यानुसार धरणातून मुळा नदीत २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. २५ ऑगस्टला कोतुळकडून मुळा धरणात पाण्याची आवक वाढल्याने नदीपात्रात १५ हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत मुळा धरणातून मुळा नदीतून तब्बल ६ हजार ८६६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या उजव्या व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी झाल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशावरून १४ ऑगस्टला मुळा उजवा व डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तन काळात लाभक्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने ४ सप्टेंबरला मुळा डावा कालव्याचे आवर्तन थांबविण्यात आले. १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुळा धरणातून २३८ दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी देण्यात आले. उजवा कालव्याचे आवर्तन १० सप्टेंबरला बंद केले. १४ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत १ हजार ११९ दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्राला देण्यात आले. राहुरी, नगर, पाथर्डी या तीन तालुक्याला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून ७८ दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मुळा धरणातून जायकवाडीसाठी १९६० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून, मुळा धरणाची पाणीपातळी समान राहण्यासाठी तब्बल ६ हजार ८६६ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडले आहे. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार १३ दशलक्ष घनफूट (९६ टक्के) होता. धरणाची पाणीपातळी १८१०.३० फुटावर गेली आहे. मागील वर्षी ११ सप्टेंबरला मुळा धरणात २१ हजार ११९ दशलक्ष घनफूट (८१ टक्के) पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११ सप्टेंबरपर्यंत मुळा धरणातील पाणीसाठा ३ हजार ८९४ दशलक्ष घनफूट जास्त आहे. ७ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस कोतुळ ४९० मिमी, मुळा नगर ५५८ मिमी, राहुरी ५५५ मिमी, वांबोरी ६२० मिमी, घोडेगाव ४८१ मिमी, नेवासे ६५२ मिमी. ७ जूनपूर्वी मुळा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ६५३ दशलक्ष घनफूट होता. ११ सप्टेंबरला तो २५ हजार १३ दशलक्ष घनफूट झाला. ७ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत धरणात २७ हजार ५१७ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले.

​कोतुळकडुन मुळा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने धरणातून मुळा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. बुधवारी (११ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता मुळा धरणाच्या ११ मोऱ्या दीड इंच उंचावून १ हजार क्युसेकने मुळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी ६ वाजता कोतुळकडून मुळा धरणात ९०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. १३ ऑगस्टला २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार दशलक्ष घनफूट झाल्याने जलाशय परिचलन तक्त्यानुसार धरणातून मुळा नदीत २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. २५ ऑगस्टला कोतुळकडून मुळा धरणात पाण्याची आवक वाढल्याने नदीपात्रात १५ हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत मुळा धरणातून मुळा नदीतून तब्बल ६ हजार ८६६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या उजव्या व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी झाल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशावरून १४ ऑगस्टला मुळा उजवा व डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तन काळात लाभक्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने ४ सप्टेंबरला मुळा डावा कालव्याचे आवर्तन थांबविण्यात आले. १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुळा धरणातून २३८ दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी देण्यात आले. उजवा कालव्याचे आवर्तन १० सप्टेंबरला बंद केले. १४ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत १ हजार ११९ दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्राला देण्यात आले. राहुरी, नगर, पाथर्डी या तीन तालुक्याला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून ७८ दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मुळा धरणातून जायकवाडीसाठी १९६० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून, मुळा धरणाची पाणीपातळी समान राहण्यासाठी तब्बल ६ हजार ८६६ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडले आहे. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार १३ दशलक्ष घनफूट (९६ टक्के) होता. धरणाची पाणीपातळी १८१०.३० फुटावर गेली आहे. मागील वर्षी ११ सप्टेंबरला मुळा धरणात २१ हजार ११९ दशलक्ष घनफूट (८१ टक्के) पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११ सप्टेंबरपर्यंत मुळा धरणातील पाणीसाठा ३ हजार ८९४ दशलक्ष घनफूट जास्त आहे. ७ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस कोतुळ ४९० मिमी, मुळा नगर ५५८ मिमी, राहुरी ५५५ मिमी, वांबोरी ६२० मिमी, घोडेगाव ४८१ मिमी, नेवासे ६५२ मिमी. ७ जूनपूर्वी मुळा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ६५३ दशलक्ष घनफूट होता. ११ सप्टेंबरला तो २५ हजार १३ दशलक्ष घनफूट झाला. ७ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत धरणात २७ हजार ५१७ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment