मुलीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात:व्यक्त केला विजयाचा विश्वास; महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा

मुलीच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात:व्यक्त केला विजयाचा विश्वास; महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आता निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात आपली मुलगी रोहिणी खडसे यांचा प्रचंड मतांनी विजय होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. वास्तविक मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यावेळी एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्यामुळे या मतदारसंघावर सलग विजयी होण्याचा विक्रम खडसे यांच्या नावावर आहे. मात्र 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. यावेळी देखील रोहिणी खडसे यांना चंद्रकांत पाटील यांचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा या निवडणुकीतील पहिला उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यामध्ये महागाई आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहेत. राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणार असल्याचा दावा देखील खडसे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे फटाके फुटतील, असा दावा देखील खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांचा ज्या कारणांमुळे गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता, ती कारणे आम्ही शोधली आहेत. त्यामुळे यावेळी त्यांचा विजय नक्की असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मनसेनेबरोबर काही जागांवर युती:देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युतीमध्ये समावेश होण्याबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर काही जागांवर युती होऊ शकते, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा… संजय राऊत यांचा रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप:आमचे फोन आजही टॅप होत असल्याचा दावा; राज ठाकरेंवरही साधला निशाणा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी आम्ही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून केली आहे. मात्र, तरी देखील निर्णय घेतला जात नाही. रश्मी शुक्ला या आमच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. पूर्ण बातमी वाचा…. प्रमोद महाजन यांना सख्ख्या भावानेच का घातल्या गोळ्या?:मोदी आणि वाघेला यांच्यात समेट घडवला; भाजपचे चाणक्य म्हटले जायचे 1995-96 मध्ये प्रमोद महाजन यांनी चतुराईने शंकरसिंह वाघेला आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष काही काळासाठी लांबवला होता. नंतर प्रमोद महाजन यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी लक्ष्मण ही उपाधी दिली. आज ‘महाराष्ट्रातील दिग्गज’ मालिकेत भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे प्रमोद महाजन यांची कहाणी… वाचा पूर्ण बाातमी….

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment