एकनाथ शिंदेंचे डॉ. बाबासाहेबांना शायरीतून अभिवादन:म्हणाले- भीम जैसा सूरज आगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला न होता

राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत विनम्र अभिवादन केले आहे. यावेळी भीम जैसा सूरज आगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला न होता, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शायरीमधून बाबासाहेबांच्या प्रति भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, भारताच्या संविधानचे शिकल्पकार, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती आहे. या निमित्ताने मी बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांना शुभेच्छा देतो व या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेबांनी सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आणि समता, बंधुता आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचे काम केले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 1881 साली बाबासाहेब यांचा जन्म आपल्या भारत भूमीत झाला आणि 1956 साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांचे स्मरण प्रत्येक नागरिकाला होत असतो. कारण बाबासाहेब आपला श्वास आहे, बाबासाहेब दीपस्तंभ आहेत. समतेचा संदेश देणारे बाबासाहेब त्यांनी या देशाला सर्वोत्तम घटना दिली. अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना बनवली. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, ही भावना त्यांनी मनात ठेवली होती. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी काही ओळी बाबासाहेब यांच्या विषयी व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे म्हणाले,
भीम जैसा सूरज आगर निकला न होता
हमारे जीवन में ये उजाला न होता,
मर गए होते युही जुल्म सहकर
आगर हमे भीम जैसा रखवाला मिला न होता
अशा शायरीमधून एकनाथ शिंदे यांनी आपले विचार डॉ. बाबासाहेबांच्या प्रति व्यक्त केले. बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबियामध्ये ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुतळा उभा करण्यात आला. तसेच लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकनॉमिकमधून पदवी घेतली. त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या आहेत. हा भारताचा गौरव आहे. 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, पण काही लोक संविधानाची लाल कोरी डायरी दाखवत फिरतात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या कॉंग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूत केले. त्यांना व त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचे काम केले. 2014 साली खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत लोक संविधान संविधान म्हणत गळा काढत होते. आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुकास्तरावर संविधान भवन चालू करणार आहोत. हिंदू बिलमध्ये देखील आनंतर्राष्ट्रीय स्तरवर बाबासाहेबांचे स्मारक उभे राहणार आहे. जगाला हेवा वाटावे असे ते स्मारक उभे राहत आहे. हे देखील अभिमानाची बाब आहे. आमे सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारांवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालणारे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना सर्वसामान्यांना न्याय देणारी घटना आहे. म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या देशाचे पंतप्रधान झाले. शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. एक आदिवसी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. ही जादू, किमया बाबासाहेबांच्या घटनेची आहे. दरम्यान, आज दादर येथे एकनाथ शिंदे यांचे पूर्वनियोजित भाषण झाले नाही. यावर पत्रकारांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, नाराजी कोणाची? बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जाणे. बाबसाहेबांच दर्शन घेणे, त्यांना विनम्र अभिवादन करणे, यापेक्षा दुसरे मोठे काय असू शकते? भाषणापेक्षा बाबासाहेबांचे दर्शन मला मोठे होते. मी सांगू तुम्हाला, प्रत्येकाने बाबासाहेबांचा एकतरी गुण घेतला पाहिजे. बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी मिळाला, तरी मनुष्यजीवन सार्थक होईल. यापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.