एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपने ठोकला तंबू?:महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याचा निर्धार; जनता दरबार घेण्याची नाईकांची घोषणा

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपने ठोकला तंबू?:महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याचा निर्धार; जनता दरबार घेण्याची नाईकांची घोषणा

राज्यात महायुतीचे सरकार असले तर महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहे. नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहेत. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच आव्हान देण्याची तयारी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचे नेते आणि राज्याची वनमंत्री गणेश नाईक यांनी, मी गडकरी रंगायतन मध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार घेणार असल्याचे देखील ते म्हणाले. इतकच नाही तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ कमळ फुलावायचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आव्हान दिल जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये एकमेकातच वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. हा त्यांचा मतदारसंघ असल्याने याकडे विशेष दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मात्र, आता याच मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत कमळ फुलवायची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे गणेश नाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये एकमेकातच वाद पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच नाराज विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगोस यश मिळाले असते तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत. आधी मुख्यमंत्री पदावरून, नंतर खातेवाटपावरुन आणि आता पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसून येत आहे. त्यातच आता मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपच्या विजयाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या सर्वांवर एकनाथ शिंदे हे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment