कॉंग्रेसच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाचे 66 पानांचे उत्तर:विधानसभा निवडणुकीवर उपस्थित केली होती शंका, 50 जागांवर 50 हजार मतदार वाढल्याचा केला होता दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निकालावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीवरच शंका उपस्थित केली. कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून 50 जगांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 50 हजार मतदार जोडल्याचा दावा कॉंग्रेसने केला होता. यावर निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून कॉंग्रेसला 66 पानांचे सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे म्हंटले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून काँग्रेसला 66 पानी सविस्तर उत्तर पाठवले आहे. आयोगाने स्पष्ट केले की, काँग्रेसने केलेले दावे तथ्यहीन आहेत. आयोगाने म्हटले की, जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 50 हजार नवीन मतदारांची भर झाली, परंतु ती केवळ 6 विधानसभा मतदारसंघांपुरतीच मर्यादित होती, 50 जागांवर नव्हे. काँग्रेसने यापूर्वी मतदान कमी असूनही अधिक दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी असा दावा केला होता की, मतदान संपल्यानंतरही 4-5 टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येते. यावर स्पष्टीकरण देताना आयोगाने सांगितले की, मतदान संपल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी फॉर्म 17C मध्ये उमेदवारांच्या एजंटकडे नोंदवली जाते. या टक्केवारीत कोणताही बदल होणे अशक्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसने अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा दावाही केला होता. नाव वगळण्याच्या प्रक्रियेत सर्व गोष्टींचे पालन करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नोटीस पाठवण्याबरोबरच फील्ड सर्व्हे करून निश्चित करण्यात आले होते की, मतदारांचा मृत्यू होणे, पत्ता बदल, संबंधित पत्त्यावर सध्या राहत नसतील तर अशा मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या या उत्तरानंतर काँग्रेसचे आरोप निराधार ठरले असून, निवडणुकीतील प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा आयोगाने पुन्हा एकदा केला आहे.